राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही !
नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई !
अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !
गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका !
वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका !
आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास !
अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस !
मरणासन्न ह