Skip to main content

कविता

अनाहत

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/08/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

घर एकटे बागेसह......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
घर एकटे बागेसह ........... घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते, एकेक झाडमाड अंतरीचे गुज येथे सांगते. पुसट लाल संकासूर बोलतो न काही उचलूनी फांद्या परी आकाशाकडे पाहतो कोण आले, कोण गेले, राहिले न कोणी तरी दाराशी स्तब्धसा, वाट कुणाची पाहतो? सरताना बहर तसा, कळ्या दोन हासल्या 'मोगराच मी सुगंधी, जरा अजून बहरतो पावसाची वाट पाहण्या, कळ्यांतून झुरतो श्रावणाची झड येता, मी पानांतून मिटतो!' शुभ्र अनंताचे कसे, विरागीच अडसर उचलेना पाऊल पुढे, वा मागेही अधिरे मौनात त्याच्या, प्रश्न किती साधेसुधे! उत्तरे खरीखुरी, तरी का मन बावरे? तुळस एकटी अकारण,रोखुनिया बघते पावलांचे ठसे माझ्या, मोजूनिया पाहते जुन्याखोल ओळख
काव्यरस

14 ऑगस्ट

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 14/08/2015 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा" आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे. कसे उमजले नाही मला आज झालो मी 82 वर्षाचा असेल मन माझे रेंगाळत समजूनी मला 28 वर्षाचा भूक,तहान अन इच्छा आकांक्षा अजूनी आहेत जशाच्या तश्या वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो कठोर दंडक आहे हा निसर्ग

होती एक नजर.......

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 13/08/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक नजर....... मला पाहणारी लाख झिडकारले तरी अंगचटीस येणारी..... होती एक नजर....... मला शोधणारी कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप तर कधी खिडकीवर रेंगाळणारी होती एक नजर....... मला आसुसलेली प्रत्येक नकाराने माझ्या सुडाने ठसठसलेली........... होती एक नजर....... मला दाहणारी पेटवून देहास माझ्या खुनशी खदखदणारी.......... होती हर एक नजर.... माझ्यावरच खिळलेली जेव्हा फोडला मी टाहो तेव्हा हलकेच चुकचुकलेली..... होती एक नजर....... धुराने धुसरलेली दिसत होते त्यात बाबा अन आई लाघवी हसणारी..... उरली एक नजर......... जगण्यास धडपडणारी प्रत्येक विझत्या निखर्‍यासवे एक बाहुली कायमची.......निजलेली

असमाधानाची

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 13/08/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक भरलेली 'शव'वाहिका एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते .........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी?? पानसरेंच्या छातीतली गोळी दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते, ..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती. नेमाडेंच्या दौतीतली शाई कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते .........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी??? कलामांची मुठमाती याकूबच्या मुठमातीला म्हणते .........मला कालच 'पालवी' फुटली, तू अजुन कोरडीच कशी?? गझलेची कैफियत कवितेच्या दुःखाला म्हणते .........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी??? माझी अ-स्वस्थता या जगाच्या स्वस्थतेला म्हणते .........असमाधानाची -तुझी ग 'व्याख्या' कोणती?
काव्यरस

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 12/08/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात.... हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों. ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान.

विद्ध

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 08/08/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(वि. सू. - ही कविता आणि कुणाल यांचा "घालमेल: हे प्रेम होतं की आकर्षण?" हा लेख यांचा काही संबंध दिसून आल्यास तो योगायोग समजावा. कारण तो फक्त योगायोगच आहे.
काव्यरस

ती वेळ

लेखक सिध्दार्थ यांनी शनिवार, 08/08/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ती वेळ मंद वाऱ्याची शब्द असे वितळावे दुरून परतीच्या माझ्या वाटेवर तुझे डोळे लागावे... तुझ्या नेत्रात सरोवरे का सखे दुष्काळ तिथे शोभे गडद अबोल सावळी झाडे सरणावर प्राण उगाच उभे.... ऊरला तुकडा नभाचा होते वादळ कधी तिथे मिटल्या सावल्या अंधाराच्या जसा सूर्य दूर मंद उगवे... अखंड घुमतो पाउस देवळापलीकडे नक्षत्रांची ओंजळ पदरात तुझ्या दु:खात तू सावित्री माझ्या अन तरी घालतेस देवास साकडे...
काव्यरस

मैत्र झुलवून बघ

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 05/08/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती