मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वादळ

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वादळ उठत.. एक मनात... एक दर्यात पड-झड़ होतेच न दोघात मोठी कुठली? सांग माझ्या कानात मनात... भावना उध्वस्त; दर्यात जीव अस्वस्थ! मनातल्या नात्यात द-या बनतात; सागरातल्या द-या भरून निघतात! दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा? सारंगाची नजर किनारा शोधते उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

वाचन 1351 प्रतिक्रिया 0