Skip to main content

कविता

टोचणी

लेखक पथिक यांनी सोमवार, 29/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री दहा वाजता ऑफिसातून घरी जाताना रस्त्यात बसलेली एक म्हातारी दिसली ती फुटपाथवर नं बसता रस्त्यातच एका कडेला थंडीमध्ये स्ट्रीट लाईट च्या मंद केशरी प्रकाशात बसलेली होती खरं तर ती एक भिकारीण होती पण नेहमीप्रमाणे ते गृहीत धरून दुर्लक्ष करून जाता आलं नाही कारण ती हात पसरून भिक मागत नव्हती जाणाऱ्यां येणाऱ्यांना आवाज देत नव्हती आपापल्या घरी चाललेल्या लोकांच्या गर्दीमध्ये त्या रिकाम्या होत चाललेल्या रस्त्यावर गुडघ्यावर हनुवटी टेकवून खाली जमिनीकडे बघत ती बसली होती अगदी चुपचाप....

करार

लेखक वटवट यांनी सोमवार, 29/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"करार...!!" त्याच्या स्वप्नांनी जेंव्हा तिच्या रात्रींशी करार केला... समुद्रही आनंदाने, होता अगदी उधाणलेला... चंद्रानंही त्याचं चांदणं दिलं असं शिंपडून… आता कसली हाय?, कसली धग?.... आणि कसलं उन...? नदीच्याही प्रवाहानं वळण घेतलं, इतकं सुंदर…. रातराणीनंही दाही दिशांना उधळून दिलं, तिचं अत्तर... सार्या कळ्यांनी फुलांसकट माना टाकल्या, अगदी लाजून... सारं रान श्रावण सरींनी गेलं, एका क्षणात भिजून… जागोजागी पडू लागली, नक्षत्रांची रासं... ...................तर, करारात ठरलं असं... कि .. त्यानं.. त्याच्या स्वप्नांनी..

'राहून गेलेलं काही...'

लेखक एस यांनी सोमवार, 29/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
'राहून गेलेलं काही...' 'वेडीच्च आहेस तू कशाला केलंस बरं माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न? आणि तू हसून म्हणावं तुम्ही हुशार आहात ना, म्हणून. हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं किनार्‍यावरल्या रेतीत तुझा हात हातात घेऊन पहिल्यांदाच चाललो होतो असे हरवलो होतो की कळलंच नव्हतं कधी तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी ते परत आणण्याच्या बहाण्यानं पुन्हा फिरलो होतो दोघं तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं तसंही गजराबिजरा आणायची मला कुठली असायला आठवण आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात हे तुला म्हण

व्यायामी ओव्या

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 27/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

मनमोर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले, लाघवी मेघदूत, खिडकीबाहेर रंगलेला..... बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा...! नेमक्या त्याच वेळी, तुझ्या निद्रीस्त चेहर्‍याला व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा....! ..... ..... हे सगळं अनुभवण्यासाठी... अवघे दोनच डोळे .... ? अं ह... आता ते दोन्ही डोळेसुद्धा मिटले आणि... आणि फुलवला पिसारा मनमोराचा....! .... ... सगळ्या अंगांगाला फुटलेत लक्ष लक्ष डोळे ... आणि सुरू जाहला, एक अलौकिक सोहळा........! विशाल पूर्वप्रकाशित :मनमोर...
काव्यरस

गुलझार

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय गुलझार, समजायला लागल तेव्हा तु जी 'माचिस' पेटवलीस ती आजतागयात चालूच आहे. 'आसमा के पार शायद और कोई आसमा होगा' अस म्हणत जेव्हा स्वप्न पुरी करण्या साठी पुण्यात आलो तेव्हा सुद्धा तू सोबत होतास. घर सोडल्यावर "छोड आये हम वो गलीया" च महत्व जाणवल तेच तू सोबत होता. रात्री बेरात्री जेव्हा पुण्यात 'एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता है' म्हणत घरोंदा शोधत भटकत होतो तेव्हा तू सोबत होता. 'सपने मे मिलती है' अस म्हणत फक्त स्वप्नात मिळणारी कुडी जेव्हा प्रत्यक्षात भेटली, तेव्हा 'पहली बार मोहब्बत कि है' असा म्हणत दोघात एक ICE -cream खाताना तुझी सोबत होती. 'हुजूर

नंगा नाचेन मी एक दिवस

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 26/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत

पैंजणे

लेखक सटक यांनी शुक्रवार, 26/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे ! उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे ! आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे ! पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !
काव्यरस

फैज अहमद फैज च्या एका कवितेचा अनुवाद

लेखक पथिक यांनी गुरुवार, 25/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
गझलसम्राट सुरेश भटांनी ज्यांना आपलं दैवत म्हटलं आहे त्या फैज अहमद फैज यांची खासियत म्हणजे त्यांच्या शायरीतला अद्भुतरम्य (romantic) आणि क्रांतिकारी (revolutionary) आशयांचा अतिशय सुंदर मिलाफ. त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे.

आंगणवाडी ते ....

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.