Skip to main content

कविता

रयतेचा राजा

लेखक शब्दबम्बाळ यांनी रविवार, 14/06/2015 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी सहजपणे ओळी सुचत गेल्या आणि त्या मी लिहून काढल्या. काही सुधारणा असतील तर अवश्य सांगा!

<<<<< सुगी >>>>>>

लेखक गोल्या यांनी रविवार, 14/06/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
वारा सुटू दे गं बाई ढग फुटू दे गं बाई माझ इवलुसं गावं चिंब नटु दे गं बाई....!! घसा कोरडा पडला ओढा नाला विहिरींचा तुझ्या पहिल्या सरी नं तहान मिटू दे गं बाई ....!! असा कसा आळसला कष्टकरी बळी राजा तुझ्या न्यार्या चैतन्यानं कामा झटू दे गं बाई....!! माती मधी निजलेलं माझ हिरवं सपान थेंब थेंब पावसानं पुरं उठू दे गं बाई ....!! दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
काव्यरस

मत्सर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 13/06/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आधी पावसाची, पावसाळ्याची चाहूल लागायची ती वातावरणात होत जाणार्‍या बदलाने. झाडांवर फुलणार्‍या कोवळ्या पालवीने आणि वळिवाच्या साक्षीने मदहोश करणार्‍या मृदगंधाच्या मादक सुवासाने. आजकाल ती लागते सोशल नेटवर्क्सवर पडणार्‍या कुत्सित स्टेटस अपडेट्सने.. उदा. आता पावसाच्या कवितांचा पाऊस येणार वगैरे..वगैरे... पण त्याला पर्याय नाही तसेच पावसाच्या कवितांनासुद्धा पर्याय नाही.... गंमतच आहे सगळी... त्याला माझाही... अगदी माझाही मत्सर वाटावा? ओके, अ‍ॅग्रीड...!

वास्तु.....

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 13/06/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
फाटकाचं दार हलकेच लोटुन आत शिरलो तर सगळी बिजागरं, एकसाथ कुरकुरली इतक्या वर्षानीं आज ह्याला आठवण झाली माझ्यापासुन दूर होत, जोरात कुजबुजली माजलेल्या गवताने घुसखोरी केलेल्या अंगणात किरकिरत तो स्वतःच, स्वता:ला झोके देत होता "कुठे उलथला होतास? खेळ अर्ध्यातच सोडलास" पहाताच मला, तारलयीत विचारत होता माडी चढुन वर गेलो तर माझ्या खोलीतल्या खिडकीची तावदानं, तावातावानं आदळत होती अशा कैक सांजा आई ताटकळली होती तिथे जणू यांचा हिशेबच, उघडझाप करुन देत होती अचानक छताकडं मान वळवून पाहिले तर तो म्हातारा वासा, शेवटच्या घटका मोजताना दिसला ओळख लागताच अगदी बाबांच्या आवाजात म्हणाला "आता माझ्याच्यानं नाही होत रे!!

राग

लेखक अजब यांनी शुक्रवार, 12/06/2015 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा चिडतो मी माझ्यावर रागवतो तेव्हाच तुझ्यावर जेव्हा जेव्हा माझे चुकते चूक मला तुझियातच दिसते ओरडतो ठोकर बसल्यावर सावर ना आता तू लवकर जेव्हा माझा सुटतो ताळ तुलाच म्हणतो संयम पाळ म्हणून करतो मी कांगावे: माझे चुकले तूहि म्हणावे

अनईझी.......!!

लेखक गोल्या यांनी शुक्रवार, 12/06/2015 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण उभा यमुना किनारी होऊनी अनईझी, गोपिका तिकडे मजेत वाट्सप्प वरती बीझी...!! दुध लोणी गायब झाले फास्ट फुडचा जमाना, गोपी खाती नुडल्स भरती बर्गर चा बकाना...!! पुर्वी एकच पेंद्या होता आता सारेच पेंद्या झाले मैदानी खेळ सोडूनी, फेसबुक वरती आले...!! गोधन झाले आऊट डेटेड गोकुळात मॉल आले, गोवर्धन विकला गुण्ठे वारी मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!
काव्यरस

फक्त तू नाही आहेस..................

लेखक झंडुबाम यांनी गुरुवार, 11/06/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी उठल्यावर आरसा बघितला की जाणवतं जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस नंतर अंघोळ करताना दिसतात शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस एकटा असताना तुझा गंध जाणवतो खूप जवळ उभी आहेस वाटून जातं पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे तुझा मोहक आवाज कुठेच नसतो आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस रात्री आकाशाकडे एकटक बघणं होतं चंद्र रोजच्यासारखाच असतो पण चांदण्यात तू नसतेस तेव्हा तुझी एक एक आठवण माझ्या डोळ्यातून ओघळत असते आणि मग जाणव

जन्म घेतला तेव्हाच....!!

लेखक गोल्या यांनी गुरुवार, 11/06/2015 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म घेतला तेव्हाचं खोदून कबर आलो औपचार म्हणून आयुष्य घालवीत होतो आलो त्याच्या कडून जायचे त्याच्याच पाशी प्याला जीवनाचा घोट घोट संपवित होतो परत करावयाचा उसना देहाचा अंगरखा हा मिजाशीने त्याला म्हणुन वागवीत होतो पुरी होती करावयाची कहाणी जिंदगी ची आयुष्याची कोरी पाने मी जगुनी भरवीत होतो उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो होता सोडायचाच मंच दुनियेचा तोंड रंगुवुनी पात्र मात्र वठवित होतो!! ------------------------------------- धागा संपादित केला आहे.
काव्यरस

वाट

लेखक अनिल रामेश्वर लांडे यांनी बुधवार, 10/06/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा लागली जीवाला, ओढ तुला टिपण्याची, साक्ष देईल प्रेमाची, भाषा ओल्या पापण्यांची. नाही हा भाव मनाचा द्वेष जरी हा डोळ्यांत, वाट पाहतो दारात पुन्हा घेण्यास घरात . चुका विसरुनी साऱ्या दुखं ठेवील पोटांत , मिरवीन चार-चौघात गोड बोलुनी ओठांत. फक्त विचारीन काय होती चुक माझ्या मागण्यांची, शिक्षा दिली एवढी दिशा पांगण्यांची. केले केव्हाच माफ सख्या आता आहे तुझी पाळी, फक्त वाट त्या क्षणाची केव्हां चुकवशील हि उधारी. @अनिल …

वडा पाव रे........!!!

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 09/06/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणे : प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा तो म्हणे : देवा , नविन चॉइस तरी कळावा.....!! ती म्हणे : बरा असतो एकच एक गडी माहीत होऊन गेलेल्या सार्या त्याच्या खोडी .....!! तो म्हणे : चांगली असे अंबाड्या ची भाजी तरीही खावी वाटे कधी तरी कांदाभजी ....!! नाठाळाला वठणी वर आणावयाचा त्रास हरेक जन्मात वाचेल बाई आमचा तो ख़ास....!! ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! जायचे तर जा नाथा नाजुक धागे तोडून हात तिने जोडले डोळे आले भरुन ....!! इथ
काव्यरस