प्रतिबिंब
लेखनविषय:
काव्यरस
मेघ सावळा का नभी एकटा?
तो वाट प्रियेची बघ, पाहतसे
विरह वेळा ही असह्य झाली
प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे
सखी प्रिया तव दूर वसुधा
आतुर मिलना मनी कळवळे
सरतील कधी, क्षण विरहाचे?
नभास वेड्या कधी ना कळे...
शल्य त्याचे कुणा ना कळले
हलकेच कसे नभ ओघळले?
विरह वेदना जळी बुडाली..
प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले...
बघतो आपले प्रतिबिंब जळी
दूर उभा तो नभमंडलावरी..,
नसेच नशिबी भेट प्रियेची...
प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी
विशाल...
फ़ोटो आंतरजालावरून साभार
फ़ोटो आंतरजालावरून साभार
वाचने
2237
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मस्तच!
अप्रतिम
कवीता मस्तच आहे पण चायला मला
In reply to कवीता मस्तच आहे पण चायला मला by टवाळ कार्टा
नेकी और पुँछ पुँछ ;)
In reply to कवीता मस्तच आहे पण चायला मला by टवाळ कार्टा
शाब्बास रे पठ्ठ्या! चल येवू
In reply to शाब्बास रे पठ्ठ्या! चल येवू by जडभरत
नौ...
सुंsssssssssदर!!!
धन्यवाद मंडळी _/\_
वा! क्लास आहे ही कविता!