हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की
स्मृतीतला गाव दिसू लागतो
त्या गाव वेशी उभा मीच मजला
पाहून अनोळखी हसू लागतो
दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या
सावलीत जरासा बसू पाहतो
स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा
उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो.
पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा
बदलाच्या भ्रांती फसू लागतो
लोभस ते जग कधीचे संपले खरा
भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो..
(कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही.
संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?
हिशोब मी हि कशास बांधू?