मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रावणसर

रातराणी · · जे न देखे रवी...
काव्यरस
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते

वाचने 3356 वाचनखूण प्रतिक्रिया 20

जव्हेरगंज 22/02/2016 - 19:12
मस्तच!! आवडली!!!

गौरी लेले 22/02/2016 - 19:45
वाह ! इथे वैशाखाची चाहुल लागत असतानाही ही श्रावणसर चिंब भिजवुन गेली :)

In reply to by गौरी लेले

प्रचेतस 22/02/2016 - 20:49
गौरीशी सहमत.

विजय पुरोहित 23/02/2016 - 20:59
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते वाह... प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या एका स्त्रीचे मनोगत अगदी प्रभावीपणे मांडलेय... तो : अगदी भाव खाणारा.... ती : त्याच्या प्रेमात आकर्षणात अगदी आकंठ बुडालेली... वाह्..... सुंदर.....

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रातराणी 25/02/2016 - 00:09
येस सर! संदीपने समजावून सांगितल आहे काय घोळ झाला तो. एक डाव माफी द्या. ( चुकीला माफी नाही अस म्हणू नका प्लीज.)

सुमीत भातखंडे 25/02/2016 - 21:34
आवडली कविता. उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते मस्त :)