करार

लेखनविषय:
करार त्याच्या स्वप्नांनी जेंव्हा तिच्या रात्रींशी करार केला... समुद्रही आनंदाने, होता अगदी उधाणलेला... चंद्रानंही त्याचं चांदणं दिलं असं शिंपडून… आता कसली हाय?, कसली धग?.... आणि कसलं उन...? नदीच्याही प्रवाहानं वळण घेतलं, इतकं सुंदर…. रातराणीनंही दाही दिशांना उधळून दिलं, तिचं अत्तर... सार्या कळ्यांनी फुलांसकट माना टाकल्या, अगदी लाजून... सारं रान श्रावण सरींनी गेलं, एका क्षणात भिजून… जागोजागी पडू लागली, नक्षत्रांची रासं... ...................तर, करारात ठरलं असं... कि .. त्यानं.. त्याच्या स्वप्नांनी..

मर्त्य

लेखनविषय:
काव्यरस
तू नाहीस मुळी मर्यादापुरुषोत्तम वगैरे, तरीही प्रत्येकीला हवाहवासा साताजन्मांचा हक्काचा सखा! रथाचाच काय, महाभारताच्या भाग्याचाही सारथी, शपथेवर जरी असलास, तुझ्या शस्त्रांना पारखा!! तुझ्या ओठांवर बासरी, किरीटाला मोरपीस, प्रेम उत्कट जगण्यावर, चैतन्याचा झरा मनी देणारा संधी, भरेपर्यंत घडा पापांचा आवेशानं लकाकत्या सुदर्शनचक्राचा, तूच संयमी धनी तुझ्या रासलीला, बाललीलांइतक्याच मोहक, मधाळ निरागसतेचं खट्याळपळाशी, जणू झालेलं एकजीव रसायन तुझा मार्ग घडवणारे तुझेच मापदंड, कधी दुभंगून नदीपात्र, प्रसंगी सोडून रण!! नावांइतकीच विविधांगी, तुझ्या प्रेमाचीही तऱ्हा राधा, मीराच काय, देवकी- यशोदेसाठीही निरनिराळी अ

(कूणास ठाऊक ?)

पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

कुणास ठाऊक ?

लेखनविषय:
काव्यरस
कुणास ठाऊक ? काय शोधण्यासाठी काय साधण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जाणण्यासाठी काय गणण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जिंकण्यासाठी काय थुंकण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नुसतेच मरण्यासाठी या जगात आलोय आम्ही आत्मशोध (काव्यसंग्रह)

मोदीभक्त आम्ही...

लेखनविषय:
काव्यरस
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा!

काही अपूर्ण कविता....

लेखनविषय:
काव्यरस
मला ना काही कळतच नाहीये काय करू त्या अर्धवट राहिलेल्या कवितांचं . . . आता हेच बघ ना त्या दिवशी माझ्या जवळून जाताना तुझ्या अोढणीचा झालेला तो निसटता स्पर्श.... कागदावर उतरवून तर घेतलाय पण पुढे काय करू त्याचं ?? काही कळतच नाहीये मला . . . आणि नविन कानातलं घालून एकदा मान किंचीत तिरपी करून आरश्यात पाहत होतीस तेव्हा, ते तुझं तसं बघणंही लिहून ठेवलंय मी माझ्या कवितेच्या वहीत... अगदी आरश्यातल्या तुझ्या सकट पण मग त्या मीटरमधे बसणारं काही सुचलंच नाहीये अजून पुढे त्यामुळे ती पण एक अपूर्ण राहिलीये सुचेल कधीतरी... कारण, तुझ्या पर्स मधे एक छोटासा आरसा असतो ना नेहमी ठाउक आहे मला! . . . आपलं भांडण झाल्यावर हक्

वाट दाट वणव्याची

लेखनविषय:
काव्यरस
जातो सूर्य झाकोळून ही किमया वेळाची, पाश येते आवळून काळभूल अंधाराची... दाराआड दडती स्वप्नं मन भरारी आभाळी, पंख छाटता दयावंत शाप मिरवू कपाळी... येता डोळ्यांत कणव कुणा जन्मीचे ऋण, किती फेडू म्हणता भर पडते नवीन... बेड्या घालून चालती इथे सारेच बंदी, मुक्त होऊन रांगती त्याला म्हणती छंदी... अशी सरता सरेना वाट दाट वणव्याची, भिजलेल्या हुंदक्यांना खोड भारी चालण्याची...

तास केंव्हा सरे?*

लेखनविषय:
पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss? दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल? वाटते लिहून-लिहून हात मोडेल! अन पेनही बहुदा झिजेल! फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास, उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास! पहिला: -हाय! तास केंव्हा सरे? दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला! शिजून-शिजून बटाटा झाला! तरी का न ये दया सरांना? फूटे न पाझर तयांच्या हृदयाला? (पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.) पहिला: युक्ति सुचली मजला खाशी वाचत बसतो आता मी सु. शि.^ (पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते.

मागणं

काव्यरस
मागे वळून पाहताना त्रास होतो- मागे वळून पाहू नकोस! आठवून भूतकाळ वाईट वाटतं- मागचं काही आठवू नकोस! दिल्या-घेतल्या वचनांची फिकिर तू करू नकोस ठोकरलेल्या प्रियकरास दया बिलकूल दावू नकोस! गेलीस निघुनी सोडून मला एक मागणी नाकारु नकोस या जन्मी भेटलिस, कृपया पुढल्या जन्मी भेटू नकोस!! (जुनी कविता- बहुदा 9वी/10वी ला असताना केली होती.)

माझी पहिली कविता.... "का ग एवढी आवडतेस मला"

लेखनविषय:
काव्यरस
माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू तरीही का मन ऐकत नहीं माझ ... का एवढी छान आहेस तू ... का एवढी मनमिळावू , शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस... तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला... पण तुझ तुलाच ठावुक बाई, तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे.... तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन.... तुझा attitude त्रास देतो मला... पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला.... एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस.... तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच... ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ... तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते
Subscribe to कविता