Skip to main content

कविता

शब्द

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 09/04/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ
काव्यरस

चारचौघांत

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 08/04/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
चारचौघांत डोळे मिटून स्वस्थ बनायला मनाई आहे चार लोकांत गेलं की सारखं बघावं लागतं डोळे उघडून नजर भिरभिरली नाही इकडं तिकडं एखाद्याच्या कपड्यावरून , फर्निचर वरून , दाढीवरून नवीन घेतलेल्या मोबाईल वरून तर आपण अस्तित्वातच नसतो नजर तर चालवावी लागतेच आणि तोंड सुद्धा बोलत राहावं लागतं सारखं चारचौघांत मौनाचं काम नाही आपले विचार , कच्चे पक्के , आपली मतं , राजकीय , अराजकीय , सांस्कृतिक , असांस्कृतिक बोलून दाखवावेच लागतात आपलं असणं त्याशिवाय ध्यानात येत नाही कोणाच्या मागचं सरकार , पुढचं सरकार , नवीन टूथपेस्ट अमुक फ़िल्म , तमुक टेक्नोलोजी अमक्याची फेसबुक कॉमेंट , तमक्याची गर्लफ्रेंड पास्ता कसा बनवतात , शेअ

अगतिकता

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार गूढगर्भ डोळ्यांत तुझ्या अपेक्षेची मासोळी हलली ते ओझे पेलण्याची ताकद माझ्या इवल्या खांद्यांत आहे का? शंका मनास काजळू लागली तुझे ओठ बोलले काहीतरी विचारांच्या भेंडोळ्यांत गुंतले मन त्यास त्याची जाणीवच ना झाली निर्विकार चेहरा पाहून माझा अश्रू लपवित ते मागे वळलीस मणामणाच्या बेडया दुःखाच्या पायी ओढीत हल्के तू चालू लागलीस थांबवावे तुला वाटले किती पण माझे शरीरच दगड झाले
काव्यरस

झेंडूची फुले

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस

भूक भागत नाही

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 07/04/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा
काव्यरस

गेले प्यायचे राहूनी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

गुंतण

लेखक pj यांनी गुरुवार, 07/04/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक तो बिलोरी आरसा हाती लागला पुरातन पण जादुई, अगदी परीकथेतल्या सारखा यौवनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वप्नात भेटलेला आज माझ्या हातात हसत अलगद विसावलेला थरथरत्या हातानी, साशंक मनानी समोर धरला आणि माझच एक आगळं रूपडं आलं भेटीला अगदी नितळ, प्रफुल्लित, अन् आकंठ तृप्तता धडधडत्या उराशी त्याला गच्च कवटाळला हळूहळू त्यावरही काळाची काळी पुट चढू लागली तर पारा उडू नये म्हणून इकडे माझी वेडी काळजी त्यातल्या रुपड्यात कुठेशी उदासीची छटा दिसली तर माझीच नजर अंधूक, अशी समजूत काढली असं त्या आरश्यात गुंतण आता जड जातय दिवसरात्र जीवाची तडफड आता असह्य होतेय ते रुपड का तो आसरा प्रिय, हा पडलाय प्रश्न उत्तराची सा

कधी कधी

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 06/04/2016 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं कधी कधी , स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं वाईट काळातच , खरं जग दिसतं तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं कधी कधी , ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं कधी कधी , परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले देता देता सारे , जरा घाईत मरून गेले चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं कधी कधी , अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी म
काव्यरस

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे