कुणास ठाऊक ?
लेखनविषय:
काव्यरस
कुणास ठाऊक ?
काय शोधण्यासाठी
काय साधण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय जाणण्यासाठी
काय गणण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय जिंकण्यासाठी
काय थुंकण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नुसतेच मरण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
आत्मशोध (काव्यसंग्रह)
वाचन
7077
प्रतिक्रिया
0