मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाट दाट वणव्याची

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जातो सूर्य झाकोळून ही किमया वेळाची, पाश येते आवळून काळभूल अंधाराची... दाराआड दडती स्वप्नं मन भरारी आभाळी, पंख छाटता दयावंत शाप मिरवू कपाळी... येता डोळ्यांत कणव कुणा जन्मीचे ऋण, किती फेडू म्हणता भर पडते नवीन... बेड्या घालून चालती इथे सारेच बंदी, मुक्त होऊन रांगती त्याला म्हणती छंदी... अशी सरता सरेना वाट दाट वणव्याची, भिजलेल्या हुंदक्यांना खोड भारी चालण्याची...

वाचने 2357 वाचनखूण प्रतिक्रिया 13

चांदणे संदीप 10/03/2016 - 10:07
अशी सरता सरेना वाट दाट वणव्याची, भिजलेल्या हुंदक्यांना खोड भारी चालण्याची...
जबरदस्त! आवडली कविता! Sandy

नीलमोहर 10/03/2016 - 11:20
अप्रतिम !!

अभ्या.. 10/03/2016 - 11:23
बेड्या घालून चालती इथे सारेच बंदी, मुक्त होऊन रांगती त्याला म्हणती छंदी...
अहाहाहाहा सुपर्ब.

श्रीरंग_जोशी 10/03/2016 - 22:29
इस कवितामें जान हैं!!

ज्ञानोबाचे पैजार 11/03/2016 - 09:12
चांगली कविता. आवडली. पैजारबुवा,