अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. .........

कन्या मानव्याची

लेखनविषय:
काव्यरस
मी अधीर मी बधीर मी रूधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसार्‍याची मी सौदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण मी जगत मी अप्रगत मी स्वगत आतापर्यंतच्या आकांताचे मी पूष्पवेली मी मूरगळली मी रडवेली कन्या मानव्याची मी पंख फैलवावे मी बंध सैलवावे मी दीप पेटवावे वंशाचे बापाच्या मी चिंब व्हावे मी वार्‍यात न्हावे मी घूंगट झूगारावे कारण मी अनंत कारण मी स्वतंत्र क्रांतीचा महामंत्र आत्मशोध (काव्यसंग्रह)

इतक्या सहज नसतं शक्य...

लेखनविषय:
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय… आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय… तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही… हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही… प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत… प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत… म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या… नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या… मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ.. मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ..

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

लेखनविषय:
पहिल्या प्रेमी गुंतत गेलो सुटणे गुंता विसरत गेलो होती काळी शेजारी ती पण गोरा मी मिरवत गेलो येता जाता हसतच होती सुचता थापा मारत गेलो जुळले सूतहि प्रेमहि जमले प्रेमी तिचिया डुंबत गेलो गडबडलो मी प्रेमात तरी आनंदाला उधळत गेलो .. .

काय भारी होतं ना बालपण

लेखनविषय:
काय भारी होतं ना बालपण काही मिळत नसेल तर रडायचं पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं आपली बालिश बुद्धी आईला कळायची आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ? कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा मिळालं कि एकदम , उर भरायचा खेळत खेळत कधी , मधेच पडायचं तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती परत न मिळायला , ती थोडी खरी होती ? मोठं झाल्यावर आता , मन तुटतं सारखं जीवा भावा

रंडीबाज कवी

लेखनविषय:
काल मी माझ्या कविता एका पोत्यात भरुन टाकल्या पोत्यात भरता भरता काही मधल्यामध्येच फाटल्या 'तुझ्या'वरच्या कविता मात्र एक एक करुन कापल्या घरामागे शेकोटी करुन मग त्यात काही फेकल्या 'रंडी'वरच्या कविता मात्र पुन्हा पुन्हा वाचल्या घडी घालून त्यांना मग पोत्यातच घातल्या तरीही काही कागद उडतच राहीले अर्धे मुर्धे जळालेले तुकडे फिरतच राहीले काही आभाळी जाऊन पुन्हा खाली झरतच राहीले तर काही राख होऊन वेदनांना कुरवाळत मरतच राहीले अजूनही काही कविता या पोत्यात सडतच आहेत एक 'ही' सोडली तर बाकी सगळ्या रडतच आहेत तुझ्या कवितांवर मी डाव साधला आहे तिरमिरीत का होईना पण एक घाव घातला आहे होरपळलेल्या मनाने अजून एक नि

कवीची कविता

लेखनविषय:
काव्यरस
कविवर्य मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी. त्यांचे काव्यवाचन ऐकल्यावर प्रतिक्रिया म्हणून सुचलेली ही कविता मी ७-८ महिन्यांपूर्वी लिहिली होती. आज इथे देत आहे. कविता ऐकावी कवीच्या मुखातुनी वीणा वाजत असे त्याच्या मनी शब्दांचे यमक जुळवुनी सहज हरेक मोती गुंफिती अलगद आईला जितके तिचे बाळ प्रिय कवीला तितकीच कविता प्रिय कवीच जाणे योग्य जागा शब्दांची आणि महती विराम चिन्हांची प्रत्येक कवीची एक शैली खास ओळखू जावे तर होती आभास मोजक्या शब्दांची ही सारी किमया साधे कवीला सहजच लीलया कवीचे ‘काव्यवाचन’ ऐकत रहावे आणि वाह-वाह करत रहावे – उल्का कडले

आमचे आगोबा [मिपाक्विता]

कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

नजरानजर अचानक

लेखनविषय:
काव्यरस
समजावले मनाला माझ्या कितीतरी मी हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. का ऐकते न मन हे सांगीतले जरी मी वळुनी पुन्हापुन्हा का बघते तुलाच नेहमी.. गर्दी बघून तिकडे रुसतो मनी इथे मी एकांत पाहुनीया हसतो खुषीत नेहमी.. नजरानजर अचानक होतोच बावरा मी त्रेधा उडे कशी मग अवघड स्थितीत नेहमी.. .
Subscribe to कविता