मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतक्या सहज नसतं शक्य...

वटवट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय… आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय… तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही… हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही… प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत… प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत… म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या… नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या… मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ.. मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ.. आम्हाला असं आमच्या सुगंधापासून पारखं करणं बरं नव्हे.. नाराज होऊन जातात ना रे मग, फुलपाखरांचे थवे…!" बरं म्हणून, माफी मागून, जायचो तिथून उठून… प्रश्न पडायचा त्यांच्यासाठी, सुगंध आणू कोठून..? सारं सारं खूप महाग, काहीच नाही स्वस्त… मुळात प्रखर उन्हात, आतलं फुल फुलत नसतं… "ज्याचं जळतं त्यालाच कळतं"… एव्हढं बाकी खरंय… . . . इतकं सहज नसतं शक्य… तोडणं "आपल्याच श्वासांची लय…!" -चेतन दीक्षित…

वाचने 1314 वाचनखूण प्रतिक्रिया 4

कानडाऊ योगेशु 20/05/2016 - 12:43
सुरेखच. (दोन कडव्यांमध्ये जागा ठेवली असती तर अजुन वाचनीय झाली असती.!)