चंद्र नको , तारे नको
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about चंद्र नको , तारे नको
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट
शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट
भारी नको , साधी नको , नको पुरी गोड
भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड
आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची
साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची
हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या
बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या
अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे
एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे
सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची
छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची
- अभिषेक पांचाळ
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी मी मना लाविली शिस्त आहे
करू लागले योजना ते उद्याच्या
न ठेवीन विश्वास आता त्वरेने
न मोड