मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाळकडू

अॅस्ट्रोनाट विनय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज पहाटेच कोसळला एक जुनाट निर्मनुष्य वाडा अन त्याला साथ देणारा चिमणीपाखरांचा खोपा नजर आपसूक शोध घेऊ लागली हरवलेल्या अस्तित्वाचा पण तुटक्या घराच्या काही काटक्याच फक्त उडत होत्या स्मशानराखेसारख्या. बुल्डोजरच्या कोलाहलात हरवलेले उमलत्या चोचींतले कोवळे स्वर ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली चिवचिवणारी अखेरची धडपड मनात चर्र झालं पण… शहाण्या माणसाकडून तिला एवढंतरी बाळकडू मिळालं पिलांना घेऊन चिमणी उडाल्याचं मला मागाहून कळालं.

वाचने 2747 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सत्यजित... 23/04/2017 - 00:35
अप्रतीम कलाटणी! (प्रतिसाद द्यायचा राहून कसा गेला?या विचारात!)

अॅस्ट्रोनाट विनय 24/04/2017 - 17:27
:)