Skip to main content

कविता

-----

लेखक मितान यांनी मंगळवार, 21/03/2017 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा हळूच कुरवाळावी पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी. त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी... जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे.. झेपले तर थोडा दूधभात घालावा म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल... कोण कुठले गरीब बिचारे देवा ! आई गं ! अरेरे !
काव्यरस

नकळत

लेखक निनाव यांनी मंगळवार, 21/03/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीत तुझ्या मज, तू बरेच शिकवून गेलीस निरक्षर होतो मी, मला पुस्तक करून गेलीस लावले होते वृक्ष मी आपल्या अंगणी बहरले ते अन सावली तू घेऊन गेलीस विश्वास करत गेलो, तू जे सांगत गेलीस फसत राहिलो मी, अन तू फसवत गेलीस निजलो मी, वचन पहाटेचे तू देत गेलीस नकळत मला, पहाट तू माझी घेऊन गेलीस -निनाव २१.०३.२०१७
काव्यरस

तो मी नव्हेच

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 21/03/2017 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो लाईफ इन्शुरन्सचा, मी पूर्ण हप्ता भरतो तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध मी सापळ्यात - माझे, पाठीस पोट बद्ध
काव्यरस

ग़ज़ल - म्हटलेच होते

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 21/03/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं. म्हटलेच होते... होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटते वाट अन खुलतेही एक प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते - अपूर्व ओक २०-३-१७
काव्यरस

शांत समय अन्...

लेखक Pradip kale यांनी रविवार, 19/03/2017 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई, माझ्या कविता आणिक गाणी शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती -प्रदिप काळे. माझा ब्लॉग:
काव्यरस

दश्त-ए-तनहाई में - तृप्ती आणि हुरहूर

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 19/03/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्‍या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं.

तू नभीचा चंद्रमा हो...

लेखक सत्यजित... यांनी शनिवार, 18/03/2017 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा... तू मला भेटायला ये..एकदा येवून जा! शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे... तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा! तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा... पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा! वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे... या नदीला सागराची वा दिशा देवून जा! सूर्य विझता रातही चालून येते नेमकी... तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा! —सत्यजित

समांतर

लेखक यांनी शनिवार, 18/03/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची आणि तिची आज अचानक भेट झाली दोघांच्या हि डोळ्यांना एकमेकांची ओळख पटली त्याची आणि तिची कधी काळची घट्ट मैत्री होती एकमेकांना एकमेकांची हवीहवीशी सलगी होती पण आज मात्र ते होते एकमेकांसाठी जसे अनोळखी होती त्यांच्यात जवळ जवळ एका तपाची खोल दरी कधी काळी त्यांनी ही एकमेकांसाठी स्वप्न पहिली होती कधी काळी त्यांची ही राधा कृष्णा सारखी निखळ मैत्री होती पण आज राधा होती अनय ची आणि तो होता रुख्मिणीचा तरीही आज त्यांच्या नात्यातला एक रेशमी धागा तसाच होता आता त्यांच्या संवादात वैखरी ला देखील जागा नव्हती कारण डोळ्यांनी त्यांच्या कधीचीच परा वाणी साधली होती कि मैत्री पेक्षा हि पुढे अजून काही होते त्यां

एकच अमृत घोट मिळावे

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 17/03/2017 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
चालता चालता जरा विसावे, दाट सावलीत जरा निजावे गंतव्यास अंतर बरेच बाकी, मागे वळून जरा पाहावे जे राहिले मागे ते विसरावे, जे आले सोबत ते घेत चालावे हरवले त्याची बेरीज कसली, मिळेल त्याचे आनंद असावे पडावे प्रश्न मनी अस्तित्वाचे, ह्या गूढाचे अर्थ कळावे अनंत आहे सागर बाकी, एकच अमृत घोट मिळावे निनाव १७.०३. २०१७

दृष्टीकोन

लेखक संदीप-लेले यांनी गुरुवार, 16/03/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्रभिंग बसवले नवीन, पण कोन तोच दृष्टीचा, वैद्यकीय प्रगती अफाट, उपयोग काय हो त्याचा ! लांबले आयुष्यमान, भर शून्य कर्तुत्वाचा, तगले जीव अनेक, उपयोग काय हो त्याचा ! जल, रस्ते, हवाई मार्गे, आक्रसला भूगोल जगाचा, वेळ नाही घरी थांबायाला, उपयोग काय हो त्याचा ! वसविली आडवी नगरे, गाठला कळस उंचीचा, निसर्ग नाहीसा केला, उपयोग काय हो त्याचा ! लडबडला, मग गडबडला, भाव अहो तेलाचा, अर्थशास्त्रात खुलासे अनेक, उपयोग काय हो त्याचा ! महागाई आली गेली, झगडा चालूच आयुष्याचा, सुगी जगाच्या बाजारी, उपयोग काय हो त्याचा ! उपसुनी खनिजं बेसुमार, गल्ला भरती बाजाराचा, मिटे ना दारिद्र्यरेषा, उपयोग काय हो त्याचा ! खुळखु