मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

नको तेवढे सत्य..... सत्यानाश !

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
काव्यरस
लहानपणी शिकविले होते, बोलावे नेहमी खरे मनात एक ओठात दुसरे, हे वागणे नाही बरे ..... आता वाटते, असे सांगणे होते कां खरेच चांगले? मनातले खरे ऐकून झालेय कधी कोणाचे भले? ..... कालच असे झाले, नवीन साडी होती नेसली पदर आखूड वाटला, सैलसर वेढे होते खाली ..... कंटाळा आला ठीक करायचा, म्हटले ह्याना विचारू अहो, चांगली दिसतेय, की पुन्हा नेसून सुधारू? .... हे तरी अस्से नां, एरवी पुस्तकात डोके खुपसून आज मात्र नेमके ह्यांनी पाहिले नीट लक्ष देऊन .... “शी शी अग काय हे कशी नेसलीय भोंगळ म्हणतील तुला मैत्रिणी किती ही अजागळ .... तुझी ती सरिता बघ, कशी साडी नेसते चोपून बघणारे सुद्धा बघतात सारखे सारखे मागे

रक्तरंग

संदीप-लेले ·
लेखनविषय:
काव्यरस
पुनः एक दंगल झाली, रक्त खुप वाहिले भगवे, हिरवे, निळे सारे रंग त्याचे पाहिले सीमेवरचे युद्ध आठवे, रक्त ज्यात सांडले रंग नव्हता त्याला, आश्र्चर्य याचे वाटले शहीदरंगी कफन, ज्यांच्या शवांवर टाकले रंग रक्ताचे त्यांच्या, त्या कफनांवर माखले दंगलीच्या रंगांचे कफन शहिदांना घातले तिरंग्यावरील पांढ-याचे मर्म काही उमगले

हे फक्त माणसातच !

शिव कन्या ·
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

कविता

संदीप-लेले ·
आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी आज वाटते ... अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी आज वाटते ... मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित

अडवाटेवरच देऊळ

·
लेखनविषय:
आड वाटेवरच्या देवळात ,चैतन्याचा गाभारा नाही मुर्ती, नाही शिळा, पुजेसाठी अंतरात रिक्त गाभाऱ्याच्या सलगीने सभामंडप आहे उभा येता जाता वाटसरू तिथे घेतात शांत विसावा गाभाऱ्याच्या डोक्यावरती कळसाचा मुकुट चढवला नाही सोने ,नाही तांबे,दगडाच्या नक्षीने तो सजला झाडे वेली पानांची भितींवर छान नक्षी रंगली रानातल्या फुलांनी बहरुन आणखीनच शोभा वाढवली खळ खळ वाहणारा बाजूचा ओढा ओंकार नाद करत होता देवळातल्या आरती साठी जणू तो टाळ घेऊन तयार होता चहू बाजूनी देवळाला वृक्षांनी वेढले होते त्या वृक्षांवरचे पक्षीच जणू तिथले पुजारी होते कुठे एखादा कोकीळ पहाटेची काकड आरती गात होता शेजारतीचा मान मात्र रातकिड्यानी राख

स्पेशल महापुरूष

परशु सोंडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
आता आता कुठं तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष एका एका जातीचा एक एक स्पशेल महापुरूष मग अपोआपचं वाटले गेली रंग, तळी, डोंगर नदया ,गाव नि गल्ल्या बोळी,मोहल्ले कॅलेडरवरल्या तारखासुध्दा सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने जो तो विणत गेला आपल्याच जातीचं कोष गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत माणूसजाती जातीच्या कशाल्याशा गर्वानं फुगून फुटू लागली सा-यांचीचं छाताडं.

हळव्या खुणा

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
डोळ्यांत क्षितिजाच्या व्याकूळ होता जीव पाऊली अश्रूंच्या होता घायाळ भाव गात्रात दु़़खाने केला होता निवारा थरथर प्राणांची पाहत कापत होता वारा कातर सुराने निशब्द झाल्या होत्या संवेदना पंखात पापण्यांच्या होत्या हळव्या खुुणा अशा संध्येकाठी एकांत होता बुडाला तू जाताना सायंतारा तमांत होता निजला

एक बेवारस प्रेत - माझा बाप

परशु सोंडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
भर रस्त्यावर कुत्री तुटून पडली होती. एका बेवारस प्रेतावर कुत्री भुंकत होती. गुरगुरत होती त्यांच्यातली त्यांच्यात रस्ता निर्मनुष्य नव्हताचं पण ते कुत्री हाकलून लावावीत असं कुणालाचं वाटतं नव्हतं. एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा प्रेत जाळून टाकण्यापेक्षा अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना असं वाटत असेल सर्वांना पण पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं वाटलं नव्हतं कुणाला. मी तरी काय करू ?