Skip to main content

कविता

म्हणूनच तर मी घोरत होते

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला पण तेव्हातर मी झोपेत होते मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती म्हणूनच तर मी घोरत होते प्रेर्ना

उधळायचे तर उधळून घे माधळून घे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
उधळायचे तर उधळून घे माधळून घे परतून ढुसण्या देऊ नकोस म्हणजे झाले निखळायचे तर निखळून निथळून जा पांथस्थाच्या पायांना जखमा करू नकोस म्हणजे झाले काफीला सोडावयाचा तर सोडून जा भिंती आडून फसवे युद्ध छेडू नकोस म्हणजे झाले कापूराचे क्षणभर पेटणे जगायचे तर जगून घे पणत्या पेटवणार्‍या ज्योतींना विझवू नकोस म्हणजे झाले हृदये कितीकांची ढवळायची ती ढवळून घे हृदय स्वतःचेही हलकेसे ढवळू दे म्हणजे झाले चांद सूर्यापर्यंत जगायचे तर जगून घे पृथ्वीला भंगवू नकोस म्हणजे झाले. अल्प प्रेर्ना

केवळ माझीया विवेका संगे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्ती पूजा करण्यास तयार आहे व्यक्तिपूजा बांधण्यास सांगू नका कोण किती मोठा छोटा माझे मला ठरवू द्या अक्षरपूजा करण्यास तयार आहे शब्दपूजा बांधण्यास सांगू नका ग्रंथ किती मोठा छोटा माझे मला ठरवू द्या असेल खड्डाही पुढे जरी माझा मला आकळु द्या अंधळा असेनही जरी मी काठीने माझेच मला चाचपू द्या चोखाळलेले नको आता ते मलाच शोधू द्या मार्ग हवे ते ठार बहिरा असेनही जरी मी वास माझाच मी शोधणार आहे अभिव्यक्ती हाकण्याचा नाही कोणता उपाय केवळ माझीया विवेका संगे माझाच मी बहरणार आहे लागलेल्या ठेचांचे ही गाणेही आनंदाने गाणार आहे
काव्यरस

तडा गेलाच आहे तर...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 17/04/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित
काव्यरस

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 17/04/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नाद मेघांचाच दर्जेदार होता पावसाचा जोर फुसका बार होता! ओल आहे काळजाच्या खोल रुतली स्पर्श त्याचा केवढा उबदार होता! रात्र होती चंद्र होता गार वारा चांदण्याचा कवडसा अंगार होता! सावल्याही हाय मज सोडून गेल्या की उन्हाचा रंग काळाशार होता?? सापडेना खंजिराची खूण कोठे काळजावर काजळाचा वार होता! ओळखावे तू मला ही आस नव्हती हा तसा माझा नवा अवतार होता! का प्रवासाला निघाला एकटा?तो... सूर्य होता वा कुणी अंधार होता? फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन आज बहुधा वाटते रविवार होता! जिंकलो..नाबाद-शतकी खेळ केला यष्टिच्या मागे कुणी दिलदार होता! —सत्यजित
काव्यरस

बाळा, उरले तुजपुरती......

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 16/04/2017 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय... सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने.

एक कप तिचा....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 16/04/2017 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा हिशोब साचा एक कप तिचा,एक माझा! दिसायला दोन्ही एकच फ्लेवरंही सारखाच फक्त चाखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा! माझा आधी संपेल, तिचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक कप तिचा,एक माझा! एकत्र असून थोडं वेगळेपण वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! तिचं सावधपण माझं अंधळेपण जगण्यातली वागण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक कप तिचा,एक माझा! गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं..

आज तु आठवलीस...

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 13/04/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु आठवलीस आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले खंत यासाठी की, मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी भीती नव्हती बोलण्याची, हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही अन् आनंदाचे यासाठी की, आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस, ताल बिघडले मनाचे, हो तालचं बिघडले मनाचे कारण तु सुरचं घेऊन गेलीस आता आजही शोधत असतो फक्त तुला, कधी मोगर्याच्या गंधात कधी फुलांच्या पाकळ्यात कधी सागराच्या लाटेत कधी चंद्राच्या चांदण्यात तर कधी तार्यांच्या
काव्यरस

शब्दतुला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 13/04/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
बहरून येती अलगद कधी मनीचे भाव अनामिक निःशब्द होती ओठ कधी मौनाच्या लाख तर्‍हा मनपाखरू शोधत फिरते मौनाच्या अन शब्दकळा सगळेच कसे गं उलगडुनी सांगायाचे सांग तुला? कधी अचानक येई भरते झरतो हलके शब्दझरा हळवी होते कधी कविता बांध फोडुनी अस्तित्वाचा कधी घुटमळते ओठी, मौनाची होऊन चंद्रकला कधी मनाच्या उंबरठ्यावर झुलत राहते मौनझुला या डोळ्यातून स्वप्न तुझे हातात लाजरा हात तुझा क्षुब्धता कधी, कधी तृप्तता, आवेग अन मिलनाचा काय-काय अन कसे किती सांगायाचे सांग तुला? मन होई बावरे झुलताना स्वप्नांचा तो चांदणझुला तू लाजून हंसता गाली, जीव होतसे अधीर असा या जगण्याचे होते अत्तर मृदगंधही होतसे फिका मी सांगत फिरतो प
काव्यरस

आई

लेखक अक्षय दुधाळ यांनी सोमवार, 10/04/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आई जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई... उगवत्या सूर्याची तेज आई... काटेरी वनातल नाजूक फुल आई... पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल, उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई... आयुष्याच्या पुस्तकातील पहिले पान आई... घरातल्या घरात गजबजलेल गाव आई... घराचा पाया, मंदिरातील देव आई... समईतून उजेड देणारा धागा आई... मायेचा फटका, जेवणातल मीठ आई... प्रश्नाला पडलेले उत्तर आई... बहिर्याचे कान लंगड्याचा पाय वासराची गाय तशी लेकराची माय आई... सरतही नाही आणि पुरतही नाही अशी जन्माची शिदोरी आई... कवितेची ओळ, गाण्याची चाल आई... आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई... जिवंतपणी दिसनारं देवाच रूप आई आ