एक बेवारस प्रेत - माझा बाप
भर रस्त्यावर
कुत्री तुटून पडली होती.
एका बेवारस प्रेतावर
कुत्री भुंकत होती.
गुरगुरत होती
त्यांच्यातली त्यांच्यात
रस्ता निर्मनुष्य नव्हताचं
पण
ते कुत्री हाकलून लावावीत
असं कुणालाचं वाटतं नव्हतं.
एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा
प्रेत जाळून टाकण्यापेक्षा
अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना
असं वाटत असेल सर्वांना
पण
पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं
वाटलं नव्हतं कुणाला.
मी तरी काय करू ?
ते कुत्री हाकलणं आता शक्य नाही
मला तरी तसं वाटतं नाही.
ते प्रेत माझ्या बापाचं असलं
म्हणून काय झालं ?
राज्य तर .
कुत्र्यांच आहे ना आता .
...................................................
.
परशुराम सोंडगे,पाटोदा
वाचने
3537
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
काहितरी आगळ वेगळ आहे.
In reply to काहितरी आगळ वेगळ आहे. by जव्हेरगंज
शेतक-याचा प्रश्न वर नुसत
आह्ह्ह्ह्ह्ह्ह,
In reply to आह्ह्ह्ह्ह्ह्ह, by अभ्या..
धन्यवाद
चार ओळी
In reply to चार ओळी by चित्रगुप्त
धन्यवाद
सहसा कविता वाचत नाही....
In reply to सहसा कविता वाचत नाही.... by आषाढ_दर्द_गाणे
धन्यवाद
जबरा..!!
In reply to जबरा..!! by विशुमित
धन्यवाद सर जी
उत्तम जमली आहे
उत्तम कविता