जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
- Read more about जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित