जीवन एक अर्थ!
आयुष्य अर्ध संपलं तरी
जगण्यातला अर्थ संपला नाही
खूप जगले म्हंटल तरी
जगण्यातला मोह संपला नाही
खूप काही बाकी आहे
जगून सारंच घ्यावं ... वाटत
एकटं... दुकटं... सर्वांबरोबर...
आयुष्य वाटून घ्यावं... वाटत!
जवानी मनाची अवस्था आहे
तिला पूर्ण भोगावं वाटत!
समाज... बंधन... झुगारून देऊन
मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!!
मात्र स्वप्नातून जाग येताच
आयुष्याचं वास्तव पुढे असतं
जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं..
विसरून कामाला लागावं लागत!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1620
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमस्कार, गेले दोन महिने थोडी
वाह.., मस्तच !
धन्यवाद! नक्की लक्षात ठेवेन
In reply to वाह.., मस्तच ! by विशाल कुलकर्णी
वाह..आवडले.
आवडली
छान लिहिलय
धन्यवाद. ही खूप मोठी कंमेन्ट
In reply to छान लिहिलय by पैसा