Skip to main content

कविता

निळा प्रवासी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/06/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण पक्षी सुजाण वारा उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा चुकवून अव्यक्तांच्या नजरा उनाड पाऊस, अवखळ गारा काळ्या डोही कातळपाणी हिरवे असुनी रान अधाशी वेशीवरती उभा थबकुनी अवकाशीचा निळा प्रवासी गंध मातीचा, धरा बहरली पानोपानी ओजही सजले डोळ्यांत कुणाच्या नीर निळे हिरव्या तेजाने डोळे निवले ये रे, ये रे ... अनंत याचना जलदांचे अवगुंठन सरले कोसळू लागल्या रेशिमधारा धरतीचे मग मी पण सुटले ! © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस

...असे आजोबा!

लेखक हृषीकेश पतकी यांनी शनिवार, 24/06/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल उघडले कपाट तेव्हा पुन्हा भेटले मला आजोबा | असण्याहूनही नसण्यामध्ये नवे वाटले मला आजोबा ||१|| शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी होते लपले असे आजोबा | इंचघडीतून अलगद ज्यांनी आम्हा जपले असे आजोबा ||२|| पुस्तकातल्या श्लोकांमधला सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा | पत्ररुपाने अक्षर होऊन अन् भिडणारे मनी आजोबा ||३|| कधी हास्याची झुळूक आणि कधी गोष्टींची लाट आजोबा | आकार आम्हाला देताना शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४|| कधी दुपारी बहरुन यावा तो संवादिनीचा सूर आजोबा | पण सायंकाळी सात वाजता चिंतेचे काहूर आजोबा ||५|| कपाट केले बंद तरीही आठवणींचे ठसे आजोबा | विचार करता काव्य स्फुरावे होते आमचे असे आजोबा ||६|| जपून
काव्यरस

वाघोबा वाघोबा किती वाजले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 21/06/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.

वाघोबा वाघोबा किती वाजले

वाघोबा वाघोबा किती वाजले, पाऊस न येताच राजीनामे भिजले| वाघोबा वाघोबा किती वाजले, म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले| वाघोबा वाघोबा किती वाजले, भूकंपाच्या धमकीने हसू फुटले| वाघोबा वाघोबा किती वाजले, आदिलशहा* येताच शेपूट घातले| वाघोबा वाघोबा किती वाजले, यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले| वाघोबा वाघोबा किती वाजले, धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले| वाघोबा वाघोबा किती वाजले, बनियासमोर** लोटांगण घातले| वाघोबा वाघोबा किती वाजले, यांच्या वल्गनांनी मावळे शरमले| वाघोबा वाघोबा किती वाजले, असा पक्ष, असे नेते हे दुर्दैव आपुले| (* - विधानसभा नि

नजरोंको चुराकर वो...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 21/06/2017 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं
काव्यरस

आनंदवन

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 20/06/2017 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी नाही जाणत उगम तुझ्या दु:खाचा तू पापी अथवा क्षण जगसी शरमेचा प्रारब्ध तुझे वा आणी येथे तुजला करुणेचा पाझर नाही चौकस इथला नि:शंक निकट ये, हाती दे तव हात या दु:खार्ता॑च्या देशी हाच प्रघात परवलिची इथली एकच अनवट खूण जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग या निबिड अरण्यी, चल रचण्यास तराणे आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
काव्यरस

और भी आसार बाकी है

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 20/06/2017 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आखरी हथियार बाकी है (और मेरी हार बाकी है ) खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है लूट भी लोगे तो क्या लोगे यह पुरा संसार बाकी है डॉ. सुनील अहिरराव (हिंदीतील पहिला प्रयत्न)
काव्यरस

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 19/06/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

अदृष्य हात

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 17/06/2017 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
चाले कशी काय ही अर्थव्यवस्था चाले कशी काय? अदृष्य हाताची ही सारी सारवासारव नव्हे काय? पैसा म्हणजे काय, सांगा पैसा म्हणजे काय? मानवनिर्मित मूल्यवाचक, म्हणजे पैसा नव्हे काय? पैसा करतो काय, सांगा पैसा करतो काय? ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे माप तो भरे नव्हे काय? कर्म म्हणजे काय सांगा, कर्म म्हणजे काय? भांडवल जमीन वापरून श्रमदान म्हणजे कर्म नव्हे काय? कर्म करते काय सांगा, कर्म करते काय? वस्तू आणि सेवा कर्मच निर्माण करी नव्हे काय? त्याला मिळते काय, सांगा कर्मचाऱ्याला मिळते काय? मालक फेकेल तेवढा तुकडा, त्याचाच नव्हे काय? श्रेष्ठ नव्हे काय, त्याचे योगदान श्रेष्ठ नव्हे काय? योग्यतेने नव्हे, श्रेष्ठत
काव्यरस

फ्लो डायग्राम---->माझ्या पावसाळी कविता॑चा

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/06/2017 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जुन्या पावसाळी कविता॑च्या कागदा॓ची शेकोटी कशी रसरसून पेटलीय ! पण ना धग ना धूर मग कुठले माझ्या डोळ्यात पाणी ? | | \/ मग कुठली पाण्याची वाफ?
काव्यरस

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

लेखक रातराणी यांनी बुधवार, 14/06/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट.