जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखनविषय:
काव्यरस
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित

मी....

लेखनविषय:
माझ्यात मी ,तुझ्यात मी तरी उरुनी राहिलो शेष मी बंदिस्त मी ,अन मुक्त मी कैदेतले ही स्वातंत्र्य मी शांत मी ,उद्विग्न मी ह्या भावनांचे काहूर मी आरंभ मी, अन अंत मी पोहोचायचे ते गंतव्य मी त्या गंतव्या पल्याड मी त्याचा ठाव घेणारा शोध मी शून्य मी ,संपूर्ण मी राहतो पुन्हा अपूर्ण मी अनादी मी ,अनंत मी सचित्तातला आनंद मी असलो सर्वत्र विखुरलेला तरीही माझ्यात पूर्ण मी नादात घुमतो झंकार मी अनाहत नाद ओंकार मी ----© ओंकार जोशी

प्रेमाचं गणित

काव्यरस
तुझं शंकुसारखं धारदार नाक शुभ्रवर्णी दंतमाला अन हसल्यावर उमटणारा गालावरचा पॅराबोला इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे लिमिटबद्ध लांबसडक केस डोळ्यांमधले कूटप्रश्न अन देहबोलीचे अॅनालॉग संदेश

धुंद पाऊस

लेखनविषय:
काव्यरस
अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला पाने हलता मोती ओघळे तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे गंध तुझा सावळ्या रानी विसावला पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला विहग जलधारांचे पालवींत लोपले गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला

कोसला

लेखनविषय:
काव्यरस
उगाच किंचीत धुगधुगलेला विस्कळीत अन विखुरलेला अस्ताव्यस्त भरकटलेला पंचविशीतला पालापाचोळा मी एक उदाहरणार्थ कोसला (अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)

काळाचे गीत

तूहि नव्हतीस, मीही नव्हतो बघ काळ कसा बदलतो तारे ते जे सदाच असती आपल्या जागी नभात वरती आज मोजण्या जागे कोणी मनात अन् मोगरे माळूनि फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या चर्चा साऱ्या गावकुसाच्या कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही         तूहि नव्हतीस मीही नव्हतो         पुरते आपण अनोळखी होतो         तू आहेस अन आज मीही         समोरासमोर अगदी, तरीही         त्याच्या हाती सर्व आहे         बघ काळ बदलला

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखनविषय:
काव्यरस
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित

जीवन एक अर्थ!

लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य अर्ध संपलं तरी जगण्यातला अर्थ संपला नाही खूप जगले म्हंटल तरी जगण्यातला मोह संपला नाही खूप काही बाकी आहे जगून सारंच घ्यावं ... वाटत एकटं... दुकटं... सर्वांबरोबर... आयुष्य वाटून घ्यावं... वाटत! जवानी मनाची अवस्था आहे तिला पूर्ण भोगावं वाटत! समाज... बंधन... झुगारून देऊन मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!! मात्र स्वप्नातून जाग येताच आयुष्याचं वास्तव पुढे असतं जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं.. विसरून कामाला लागावं लागत!!!

या गुलाबाच्या फुलाला...

लेखनविषय:
काव्यरस
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित

मग्न तळ्याकाठी

लेखनविषय:
काव्यरस
जा॑भळ्या टेकडी तळिचे ते तळे खुणावुन हसले अन पहाटफुटणी मधल्या केशरात अलगद लपले थरथरली तीरावरची गवताची पाती ओली वाऱ्याची फु॑कर येता पाण्यावर झु॑बर फुटले घनदाट शा॑तता तिथली तोलून थिरकत्या प॑खी पाखरू एक इवलेसे क्षण एक लकेरुन गेले नि:शब्द, तरल जे सारे ते इथेच जन्मा आले कोवळे ऊन टिपताना झिरझिरित धुके शिरशिरले चल पुन्हा तळ्याच्या काठी चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ अस्वस्थ जगाचे मागे कोलाहल सोडुनी सगळे. - उदय
Subscribe to कविता