II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

लेखनविषय:
भ्रम कैवल्याचा साधला भक्ती नामातच तू बांधला कुणी पहिला रे तुला दगडामध्येच अडकला खांब सोनेरी रुपेरी तरी उभा विटेवरी बडवे मातले ते सारे उगा भक्तांसी छळे ऱे दावुनी कोरी नोट त्यांसी उभे माउली दर्शनासी बनवून माऊलीस दासी बडवे राजभोग भोगती तुझा दरबार पातला, दुर्लभ भक्त दर्शनासी स्वतः समजून ते राजे शिवीगाळ गाभारा माजे कैसी शिस्त नाही जाण कोऱ्या नोटेस फक्त मान तुझ्या दरबारी विठुराया फक्त लक्षुमीची छाया हात सोड कटेवरचे उचल बडव्यांशी लढावया सिद्धेश्वर विलास पाटणकर C

तुफान आलंया !!

लेखनविषय:
तुफान आलंया !! हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत होती फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून टाकेन हिरवं शिवार , बैल गाडीवर मग होईल सवार , .....कापडं नवीन घालेन, असेल माझाच कापूस .....उद्या पडेलच की पाऊस !!! मातीत मिसळले बरेच आधीच हाय खाऊन , प्रश्न सुटतील का पण अशी आत्महत्या करून , विठू उभा राहील पाठी

II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

लेखनविषय:
छन्दीष्ट्य वातावरणी जर्जर धारा हि सारी जरब कायम असे दिनकराची दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II यति नग सारे काष्ठ मांडी हाट सारा त्रागा मरुत वाही रिक्त अंबार सारे II कंगाळ बळीराज करी मख घेउनि नांगर हाती अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II अक्षर आरोहण अर्ध्वयु ते साधे अनृत अनुज मानुनी बलीराजासी उध्रुत उधम इंद्रजाल सारे बळीराज किंकर अख्नंडीत माझे II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

भेटी लागी जीवा . .

लेखनविषय:
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

लेखनविषय:
बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!

उगवता सूर्य आणि तो

लेखनविषय:
काव्यरस
उगवत्या सूर्याला पाहून तो छद्मीपणानं म्हणाला तुझं उगवतं रूप फार फसवं आहे मित्रा सकाळच्या किरणांना कोवळं म्हणण्यापेक्षा दुबळं म्हटलं पाहिजे कारण मी तुझं हे शतकानुशतकाचं राहाट गाडगं पाहून कंटाळलोय संध्याकाळी मावळताना हसलेलं आणि उगवताना वैतागलेलं पाहिलंय तरीही तुझा उदयच लोकांना का आवडतो अस्त का नाही? उगवत्याला दंडवत मावळत्याला का नाही? सूर्य म्हणाला ज्याच्याकडं काम असतं त्यालाच जग हात जोडते काम संपत आलं की लगेच त्यालाच रद्दीत काढते मग रक्त आटवलं तरी जग दखल घेत नाही तुम्ही नष्ट झालात तरी जगाचं आडत नाही कामाचा सूर्य थकल्यावर लोक पाठ फिरवतात कामचुकारपणा जपण्यासाठी नव्या सूर्याला कवटाळतात

भूमिपुत्र आणि काळी आई

लेखनविषय:
काव्यरस
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या सुकल्या डोळ्यांनाही भिजवेल एवढं पाणी त्याला द्यायला सरकार तयार नव्हतं त्याला दिलेल्या अश्रूंचाही कोटा त्यानं खर्च केला होता कधी मरणारं जित्राब पाहून कधी सावकाराला जमीन विकून तर कधी हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसानं झोडपलेलं पाहून अपयशाच्या पहिल्या पायरीवरच जगत त्याच्या अनेक पिढ्या काळ्या मातीत मिसळल्या पण त्या समिधांनीही भूदेवता प्रसन्न झाली नाही की लक्ष्मी देवतेने भरभरूनवआशीर्वाद दिला नाही सावकार रूपी लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला मात्र त्याचं नशीब बांधलं गेलं ते कायमचंच अंधार्या भविष्याच्या सात-बार्यावर मात्र त्याच्या आर्त वेदनांचं गोंदण झालं कधी भूमिही

व्याकुळकथा

लेखनविषय:
काव्यरस
तो शुद्धीवर नव्हता तेव्हा कोणीतरी त्याला नकळत जमिनीवर उतरवलं आणि अनोळखी टापूमध्ये त्याची पावलं त्याच्या इच्छेविरूद्ध पडू लागली आजुबाजूच्या अनोळखी लोकांनी त्याच्या रडण्याचा आनंद घेतला तो ओळखीचा संकेत समजून त्याने तो प्रदेश आपलाच असण्याचा समज करून घेतला पहाटवेळच्या आश्वासक आवाजांतून आणि स्पर्शांतून दररोजच्या सूर्योदयांच्या विभ्रमांतून याच्याही डोळ्यांमधीळ काळ्या बाहुल्यांच्या पडद्याआडच्या मनात काही इंद्रधनुष्यं दबा धरून बसली सूर्य जसा जसा वर येऊ लागला तसे पहाट स्वनांच्या इंद्रधनुष्यांमागे याची अबोध पावलं प्रारब्धाच्या वार्याबरोबर अलगद पडू लागली आणि मोठी होऊ लागली सूर्य माथ्यावरून जसा कलू लागला

भरारी

लेखनविषय:
काव्यरस
..आणि त्याचं विमान त्या सवयीच्या झालेल्या रन-वे वरून पुन्हा भरारी घेत उंचच उंच आकाशी झेपावलं विमानाच्या वेगानं मन मात्र पुढं सरकायला तयारंच नव्हतं त्याच्या उमलत्या काळाच्या आठवणी, त्याच्या पावलांना चालतं करणारे आश्वासक हात त्याच्या वेगाला मूकपणे वाखाणणारे डोळे त्याच्या वेड्या साहसांनंतरही मायेने त्याचे अपराध पोटात घेणारी मनं.. त्याच्या इंद्रधनुष्याकडे जाणार्या रस्त्यावर ढगासारखी आड येत होती तेवढ्यात सर्रदिशी वीज लखलखून त्याला भविष्यकाळ दाखवून गेली मग त्यानंतर समुद्रात पाऊस पडला सोडलेला देश अंधुकसा दिसू लागला त्याला सूर्य दिसावा म्हणून त्याच्या देशानं स्वत:ला अंधारात ठेवणं पसंत केलं.

अविनाशीत्व

लेखनविषय:
काव्यरस
ग्रीष्माच तप्त ऊन , पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग गावोगावच्या आबाल वृद्धांनी श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक देवाने ऐकली बहुतेक. कारण ..
Subscribe to कविता