Skip to main content

कविता

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी गुरुवार, 29/06/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला विषाद नव्हता मनी तो कसला ना होती मनीषा अन विजिगीषा पाषाण शोधण्यातच हया गेली अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन अक्षय संचयात किल्मिषे दाटली पृथ्थककरणात अन निरूपणात कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली भ्रमिष्ट अस्थिपंजर शोध कूर्म गतीने पाषाणाचा अनिर्वचनीय बंधनात अविरत सोबतीने शोध अस्तित्वाचा अनावृत वैचित्र्य अनाहूत गाठे यथास्थित स्थितिस्थापक क्षणभंगुर वाटे शिरकाण बलिदान ती ज्येष्ठ नाती पाषाण शोधण्यात दिली मूठमाती सिद्धेश्वर विलास पाटणकर C

ती उत्तर मागत नाही...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 29/06/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
काव्यरस

कविता :: II बॉस हा नेहमी बॉस असतो II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी गुरुवार, 29/06/2017 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस हा नेहमी बॉस असतो तुमचा काय न आमचा काय एकदम झक्कास असतो आपल्या खाली वात लावून उजळतो कार्यालय सारे अन लख्ख प्रकाश टाकतो बॉस हा नेहमी बॉस असतो तुमचा काय न आमचा काय एकदम झक्कास असतो II नको वाईट वाटून घेऊ दुः ख समजतंय मला , मित्रा तू देखील आमच्या सारखाच येतोस कामावर बुडाखाली लावून पत्रा टक टक आवाज होई पत्र्याचा पत्रा निनादत राहे गरीब मेहनती कामकरूस तो ठोकुनी निरखुनि पाहे II बॉस वरचा क्लास असावा पाहताक्षणी तो उर भरावा पंचेन्द्रीयांनी सलाम ठोकावा जणू नकळत खाली भूकंप यावा II बॉसने शस्त्र हाती घेता होई पत्रासज्ज जनता मारे लाथ अन धरुन तो ठोके कुण

आयुष्याची गाडी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/06/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो

माझ्या गावाचा पाऊस..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 27/06/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गावाचा पाऊस आडंरानी आडंवनी.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6 फुले अंगांगी हो त्याच्या रूजे थेंब पानोपानी..

कविता II अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 27/06/2017 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता ठाऊक मजला ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात निवड चुकली जरी तुझी पहिली तरी अजून एक हात धरायला हवा होता II हि वाट नयनांनी खुलते स्पर्शाने फुलते रमते मन सदैव त्यात अचानक सत्य येता बाहेर अकस्मात होतो मनावर आघात II अपघात घडतच असतात अशा फैरी नित्य झडतच असतात म्हणून मनाची बंदूक म्यान करायची नसते पुन्हा नव्याने उठून अजून एक फैरी झाडायची असते II विसरायचे ते सारं काही आता कशात मन रमत नाही असं पुन्हा म्हणायचे नाही पंख छाटलेले नसतात ,असे बंदिस्त अंतरी ते पुन्हा फुलवून सारे ,घे कवेत आकाश ते सोड भूत पाश जुने , अजून एक नवा चान्स घे II सिद्धेश

घराला मनांचा उबारा करु!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 27/06/2017 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु!

मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/06/2017 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
काडीचा सरडा ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते. होती शुष्क एक काडी झाडावरती तुटूनी पडली खाली धरणीवरती जणू ओढावले तिचे मरणचकी वय होवोनी मातीत मिळाली वेगळी झाली मग तिचे व्हावे काय? धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी पुढील पाय लांब केले खाली रेटूनी लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात
काव्यरस

निळा प्रवासी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/06/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण पक्षी सुजाण वारा उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा चुकवून अव्यक्तांच्या नजरा उनाड पाऊस, अवखळ गारा काळ्या डोही कातळपाणी हिरवे असुनी रान अधाशी वेशीवरती उभा थबकुनी अवकाशीचा निळा प्रवासी गंध मातीचा, धरा बहरली पानोपानी ओजही सजले डोळ्यांत कुणाच्या नीर निळे हिरव्या तेजाने डोळे निवले ये रे, ये रे ... अनंत याचना जलदांचे अवगुंठन सरले कोसळू लागल्या रेशिमधारा धरतीचे मग मी पण सुटले ! © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस