Skip to main content

अविनाशीत्व

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/07/2017 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्माच तप्त ऊन , पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग गावोगावच्या आबाल वृद्धांनी श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक देवाने ऐकली बहुतेक. कारण .. यानंतर जवळच्या संगमावरून गार वारे वाहू लागले नंदादीप उजळले , दीप माळांनी तळावलेल्या डोळ्यांचे पारणे फिटले आरत्या - कीर्तनांच्या आवाजाने कान तर प्रसादाच्या माधुर्याने जठराग्नी निवळले अचानक आलेल्या समाधानाने भक्त लोक प्रदक्षिणा मार्गावरच गाढ सुखाच्या झोपेत प्रवेशले.. कोणतीही जातीपातीची वर्गवारी न करता. जाग्या होत्या तीन अविनाशी गोष्टी शांत चंद्र तारांकित आकाश झुळूकांवर झळकणारा धर्मध्वज आणि नदीवर थांबून राहिलेला पहाटेचा पहिला सूर्यकिरण !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 688
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया