मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भेटी लागी जीवा . .

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

वाचने 7241 वाचनखूण प्रतिक्रिया 11

पिशी अबोली Tue, 07/04/2017 - 23:28
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..