Skip to main content

कविता

वासफुलं

लेखक Swapnaa यांनी मंगळवार, 03/10/2017 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
वासफुलं काळोख्या अंधारांत अचंबनेच्या वळणात, वेदनांच्या आवाजांत जळणाऱ्या दिव्यांत, कळ्यांच्या बाजारांत पैश्यांच्या व्यापारांत, शृंगाराच्या पसाऱ्यात वासनेंच्या डोळ्यांत, विकृतीच्या प्रहारांत अश्रुंच्या पुर्णविरामात...... कवी - स्वप्ना
काव्यरस

हे बहुरुपी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 30/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हे बहुरुपी मृत्यो एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज? उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी? की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई? कळत नाही, दोष देऊ कुणा ? या बजबजपुरीचा बकालपणा ? की तुझा निरंतर मायावीपणा ?
काव्यरस

मन

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन मायेचा वारसा मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

देवीची शेजारती

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 25/09/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
|| देवीची शेजारती || नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची अंबे शेज फुलांची पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.|| पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती अंबे नवविधा भक्ती | ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ || षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो अंबे वारा घालितो | पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ || दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला अंबे नाजूकसा शेला | सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३|| सहस्रकोटी सूर्य तेज असे हास्यमुद्रा अंबे असे हास्यमुद्रा | वेळ झाली निजावयाची सुखे करी निद्रा ||४ || जागे कराया येऊ आम्ही पहाटेच्या प्रहरी अंबे पहाटेच्या प्रहरी |

मी माझे तारांगण सादर करतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 25/09/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कुठे कोणाचा आदर करतो पाठीवरती वार बिरादर करतो प्याद्याला आदेश रणाचा देतो नि तिथुनी घुमजाव बहादर करतो गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर देवाचे रक्षण जमगादर करतो तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी मी अवघ्या देहाची चादर करतो आळ नको घेऊ, झाडाझडती घे (मी माझे तारांगण सादर करतो) देव दयाळू आहे कळल्यापासुन रोज नवे कन्फेशन फादर करतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

उरल्या त्या फक्त आठवणी

लेखक RDK यांनी शनिवार, 23/09/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुखरूप आणि सुरक्षित अशा गावातून बाहेर पडलो निघून आपल्या परिवारातून जगामध्ये आलो नशीब आजमावण्या कठीण परिश्रमही केले जगणे ना मजला कधीही कळाले हसण्याचा आवाज माझाच माझ्या पडतोय कानी जणू काही मलाच चिडवू पाहतोय गाणी गायलेली शाळेतील माझ्या माझ्या जखमांवर फुंकर घालताहेत एकेक मित्र उडत येवून  हातांनी मोठा घेर बनवताहेत बनून डोक्यातले विचारचक्र गरगर फिरताहेत थंडीच्या दिवसातील थंडी उन्हाळ्यातही वाजतेय "आजारी पडलो का ?" म्हणून  हात कपाळावर जातोय उडता आले असते तर गावी उडून गेलो असतो परतता आले असते  तर भूतकाळाला घट्ट बांधून ठेवले असते भिंतीच्या कोपऱ्यात लपून बसावेसे वाटतेय बाहेर

"जलवंती" वर प्रवेश करण्याआधीचे इशारे

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
महासागराचे अथांग पाणी........ संकटे एकटी कधीच येत नाहीत पाण्याइतक्याच खोल अशा नियतीची सदैव साथ घेऊन येतात वरचे असीम आकाश.......मनातल्या साऱ्या आकांक्षा चुरडून टाकणारी निराशेची पोकळी दूर राहिलेला किनारा.......कधीकाळी पाहिलेली स्वप्ने ........ आठवणीतच राहिलेले आप्तस्वकीय तरीसुद्धा तरीसुद्धा प्रवास कुणी टाळत नाही पाय थांबत नाहीत हात थकत नाहीत डोळे शिणत नाहीत मन मात्र स्वप्नांचे पंख लावून दिशाहीन असीम आकाशात विहार करतच रहाते अशा प्रवासाला शेवटचा मुक्काम नसतो असते ती फक्त अर्ध्यातून सुटलेली सोबत कधी घरादाराची कधी सख्या-सवंगड्यांची जिवलगांची कधी कधी तर स्वतःची सुद्धा.

"जलवंती"ची ओळख

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जलवंती" एक अजस्र नौका जी कधीही बुडणार नाही असा तिच्या निर्मात्याचा विश्वास होता "Titanic, can never sink" "Titanic" केवळ नौका नव्हे, हे एक स्वप्न! केवळ एका मानवाचे नव्हे तर नियतीला सतत आव्हान देणाऱ्या समस्त मानवजातीचे स्वप्न हि तिची कथा जलवंतीची त्या कलाकाराची त्या नौकेची जी कधीच बुडू शकणार नव्हती कधीच ! ! !

जलवंती

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
“जलवंती” च्या निमित्ताने साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल. “Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते. प्रचंड आवडला.