Skip to main content

सातोरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 05/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर जला मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती-अन विरती मेघांवरती रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे अनादि काल-प्रवाह वाहे अंत तयाला कुठे असे? अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे
लेखनविषय:

वाचने 1206
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया