गिरनारला दत्तगुरूंच्या दर्शनाला जाण्यापूर्वी केलेली कविता...
तुझ्या दर्शनाची लागलिया ओढ,
कधी भेटशील गुरुराया |
उजाडला तो दिस येई अग्निरथे,
भेटीचा योग सुखेनेची यावा ||१||
भेटशील गिरनारी कधी नच कल्पिले,
कृपेनेची तुझिया झाला चमत्कार |
मनी पाहे तुझिया त्या डोंगरावरी,
बोलाविलेस का रे मजला तू उद्धराया ||२||
मानले या जन्मी तुज गुरुस्थानी,
का लाविलास भेटी तू इतुका वेळ |
आनंदाचा क्षण आला आता हाती,
येतो तुझ्या चरणी माथा टेकवाया ||३||
डोईजड झाला मज पापांचा हा भार,
करशील का हलका तुझिया कृपेने |
असेना कसाही जरी मी या जन्मी,
घेशील का उरी तू मला सावराया ||४||
देऊ नकोस अंतर लोटू नकोस दूर,
हेच या जन्मी म