काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली.
सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ?
म्हणजे बघा, साधारण दोन - अडीच महिन्यापुर्वी त्यांच्या सुनेचा, रंगुचा अपघाती मृत्यु झाला. तिचा नवरा, लंगडा राम्या त्यानंतर महिन्याभरातच कुठेतरी बेपत्ता झाला, मग महिन्याभराने त्याचं प्रेतच सापडलं. त्या धक्क्याने कुशाक्काला वेड लागलं. शेवटी आम्हीच इथल्या वेड्याच्या इस्पितळात तिच्याबद्दल माहिती दिली आणि काल तर ते लोक येवुन घेवुनही गेले कुशाक्काला.
जरा कळलं नाही..
In reply to जरा कळलं नाही.. by योगी९००
प्रश्ना बद्दल आभार
विसरलो
स्पष्टीकरण