मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

साय्लेंट मोड

मितालि ·
रस्त्यावर चालत असताना सतत फोनवर बोलणारे काही आनंदि चेहरे आणि पाळीव कुत्र्याला मैत्र बनवलेले काही चेहरे.. प्रत्येकामागे एक कारण असते..प्रत्येकाला सतत बोलायला आणि ऐकायला कुणीतरी हवे असते..

दैव !!

विशाल कुलकर्णी ·
प्रिय निखील, कसा आहेस रे ? खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा. तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी? नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं. ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची.

जेव्हा डोळे पाणावतात.

श्रीकृष्ण सामंत ·
मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या. "अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?" असं मनोहर मला म्हणाला. मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत. "आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवल

शनिवारवाड्याचे रहस्य (कथा)

सागर ·
नमस्कार मित्रांनो, पुढील कथा मी कॉलेजमधे शिकत असताना लिहिली होती. त्या कथेत माफक बदल करुन मी ही कथा सर्व वाचकांच्या सेवेस सादर करत आहे, वाचकांना विनंती की आपले अभिप्राय जरुर द्यावेत. - सागर ------------------------------------------------------------ शनिवारवाड्याचे रहस्य -१- रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो.

हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.

श्रीकृष्ण सामंत ·
प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले, "माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो." कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो, "तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं.

एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.

श्रीकृष्ण सामंत ·
काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्‍याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत आहे बघा.निर्मीती ही निसर्गाची आवश्यक जरूरी असल्याने जीवनाचा र्‍हास होणे त्याला न लगे. म्हणून कुणाचाही सहजासहजी मृत्युला मिठीमारण्याचा प्रयास निसर्गच उधळून लावतो.

"अबोली"

शितल ·
आज राहुलने मला घरी बोलावले आहे, त्याला माझ्या बरोबर काही तरी महत्वाचे बोलायचे, विचारायचे आहे. मला कल्पना आली आहे, तो आज मला काय विचारेल, मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली आहे. साहिलने कार काढली आणि राहुलच्या घरी जायला निघाला, राहुलच्या घराकडे जाताना मध्ये एक सुंदर तलाव लागतो ५ मि.

कांद्दाची भजी.

श्रीकृष्ण सामंत ·
ज्याला आपण कांद्दाची भजी म्हणतो त्याची रुचिदार चव कुणाला माहित नसेल असं वाटत नाही.एव्हडं काय आहे त्या भज्यात?असं कुणी विचारलं तर काय सांगणार?.कुणी विचारतं की ही भजी क्षुधावर्धक आहेत का?की कुणी विचारतं ही भजी खाऊन पोट भरता येतं का?