मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

हत्या !!!

दशानन ·
खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती . * "फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर..

नम्रतेचा अमुल्य धडा.

श्रीकृष्ण सामंत ·
"शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं." माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता. शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.

इब्लीस चाचा आणि इतर काही गोष्टी.

रामदास ·
रविवारची सकाळ.चाचा आरामात पेपर पहात बसले होते. चाची आली .चाचांना म्हणाली , "काय हो पेपर बरे वाचताय सकाळी" "दुसरा काय ऑप्शन आहे गं आपल्याला.चाळीतली माणसं आपण .सकाळी दरवाजा खुल्ला ठेवावा लागतो ना. " चाचा चाचीकडे डोळ्यात इश्क आणून म्हणाले. चाची खमकी ."पेपर बघताय निस्ते ,चष्मा बरा लागत नाही " चाचानी एक मोठ्ठा दर्दभरा सुस्कारा सोडला. "आजकाल पेपरात बघण्यासारखंच असतंय ग.आणि तू मिड डे बंद केल्यापासून ....."चाचानी आणखी एक सुस्कारा सोडला. "अहो काही लाज , शरम ,कुलकी मर्यादा काही आहे की नाही ..किती म्हणून पेपर बंद करायचे, आधी तो चावट पारशी करंजीया आणि त्याचं ब्लिट्झ.

भिंगरी

श्रीकृष्ण सामंत ·
आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला "फारमात" दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले, "मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर "चर्वीचरण" करायला हूक्की आली आहे" मी म्हणालो, "भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.?

''ती''

JayGanesh ·
टन टन टन टन टन टन टन टन टन टन ....... झाली एकदाची मधली सुट्टी. आमच्या शाळेची मधली सुट्टी १.३० ला होते, वडापाव खावुन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, बाबासाहेब, संदीप, नाग्या, प्रशांत, धोंडे (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण वर्गात रोज गणीताच्या आणी इग्रंजीच्या तासाला मजबुत मार खातात) आणी इतर ९ वी तली मुले (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमचा शाळेच्या मैदानातील झेंड्या खाली गप्पा मारत उभे होतो.

दी कॅट इन दी हॅट - अर्थात टोपीवाले मांजर

चित्रा ·
डॉ. सूस - आजचे गूगलचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा लक्षात आले की आज डॉ. सूस यांचा वाढदिवस. आज असते, तर ते १०५ वर्षांचे झाले असते. डॉ. सूस हे त्यांचे खरे नाव नव्हे, खरे नाव थिओडोर गीजल. सूस हे त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे आडनाव (तसेच त्यांचे मधले नाव) त्यांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहीताना टोपणनाव म्हणून लावले. डॉ. सूस यांच्या पुस्तकांशी माझी तोंडओळख इथे अमेरिकेत आले तेव्हा पुस्तकांच्या दुकानांच्या शेल्फांवरच्या त्यांच्या एकदोन पुस्तकांमुळे झाली.

अस्तित्व

दशानन ·
आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी.

अक्षराची किमया.

श्रीकृष्ण सामंत ·
"माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं." आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख होता होता निघून जायची.तिला दोन तिन मुली होत्या.त्यातली धाकटी चमेली तिच्याबरोबर नेहमीच असायची.ती जशी शाळेत शिकायच्या वयाची झाली तेव्हा तिला मी नेहमीच म्हणायचो, " चमेली तू खूप शिक.शिकलीस का तुला जगायला मजा येणार.आणि तुझ्या आईसा

फेड...

बिपिन कार्यकर्ते ·
"राजू...." आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली... "राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?" आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं.