ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?
अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो,
"काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?"
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं.
लागलीच ती मला म्हणाली,
मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे.एखाद्
मिसळपाव