शुक्रवारी संध्याकाळी मेरीचा फोन आला. म्हणे "उद्याची काय गंमत आहे, माहितीए? ते चित्रकार विल्यम ब्राउन आहेत नं? ते आपला स्टूडियो आपल्या चाहत्यांसाठी उघडा ठेवणार आहेत. अरे आपल्याला थोडीच परवडताएत त्यांची चित्रं, पण कलाकारासमक्ष त्यांची कला अनुभवायची काय नामी संधी!" मी म्हटले, "वा, सुंदर!"
"पण तुझा मित्र राजेश, बथ्थडासारखा टेनिस खेळायला जातोय म्हणतो."
"बयो, राजेश आधी तुझा नवरा, मग माझा मित्र आहे. त्याच्या रुक्षपणाचा जाब मला नको विचारूस."
"ए राजेश! आयडिया!" मला फोनवर लोंबकाळत ठेवत ती ओरडली. "तू जा टेनिस खेळायला. मी जाईन स्टूडियोत तुझ्या या मित्राबरोबर.