मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

मालवणी गजाल.

प्रतिभा बिवलकर ·
आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान. झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय.

वळण !!

अनिल हटेला ·
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

जीवनातल्या येणार्‍या कसोटीमधून अस्तीत्व कसं टिकवायचं.

श्रीकृष्ण सामंत ·
"स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं, माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्‍हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला " काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं हे लक्षात येत नव्हतं.आता नलू एक मुलाची आई झाली असून आता ती एका कॉलेजमधे लेक्चरर म्हणून काम करते. एकदा मी बसच्या लाईनमधे उभा होतो.माझ्या मागे नलू आपल्या मुलाला घेऊन उभी होती.चूळ्

"विविधतेतून अखंडता"

श्रीकृष्ण सामंत ·
"क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत. "जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं." प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली, "काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे." मी तिला म्हणालो, "संध्याकाळी,जुहू चौपाटीवर जाऊन आपण मावळत्या सूर्याचं दर्शन पोटभर घेऊ शकतो.पण उगवत्या सूर्याचं दर्शन तुला कलकत्या सारखं सकाळी

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

यशोधरा ·
सुमल्याची आश्रम वारी!!...(१) अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!" "मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??" "होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!!

आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

श्रीकृष्ण सामंत ·
प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता "शिक्षक". भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली.भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदार अनुभव सांगितले. मात्र एका वयस्कर व्यक्तिने "शिक्षक" म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्या