टन टन टन टन टन टन टन टन टन टन .......
झाली एकदाची मधली सुट्टी. आमच्या शाळेची मधली सुट्टी १.३० ला होते, वडापाव खावुन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, बाबासाहेब, संदीप, नाग्या, प्रशांत, धोंडे (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण वर्गात रोज गणीताच्या आणी इग्रंजीच्या तासाला मजबुत मार खातात) आणी इतर ९ वी तली मुले (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमचा शाळेच्या मैदानातील झेंड्या खाली गप्पा मारत उभे होतो.