मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

सर्व देशाला जेवणाचं निमंत्रण.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही" नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली.भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले, "हे शुभ्रतो चक्रबोरती.आमच्या कॉलनीत राहायला आले आहेत.आमच्या कॉलनीत जवळ जवळ बारा बिल्डिंग्स असून देशातले निरनीराळ्या प्रांतातून आलेले लोक राहतात. शुभ्रतो मुंबईत आल्याआल्या प्रथम वसईला राहिले.नंतर ते गोरेगाव इस्टला बर

मनश्री

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही.. कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्‍या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं. उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं.

स्वच्छ हवेचा पहिला श्वास

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
" मी वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो." काही व्यक्तींच्या नशीबात सदैव दुःखच असतं.अर्थात नेहमी सुखाचे दिवस मिळणं जरा अपवादात्मक आहे.पण जीवन जगायला सुखदुःखाची कमी अधिक प्रमाणात जरूरी भासते.होऊन गेलेल्या घटना आठवणीत आणून मन रिझवण्यात मजा येते.

तु !

दशानन ·
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

१५ ऑगस्ट चा दिवस

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. "गप रे" ति वैतगली होति. जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी..ति म्हणाली माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. अन काय कळवणार? तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि......ति सिरियस् झाली होति अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम, एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.....तो वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा ये‌इल. येतो.

लतादीदीस सप्रेम.........

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
तुझे गाणे तुझे नाही तुझे असणे तुझे नाही ते किंचित हंसणे तुझे नाही.. तो गंधार, तो मल्हार असतील ते सुर तुझे, पण त्याचे वेड तुझे नाही ! तुझ्या ओठीचा शब्द तुझ्या गळ्याचे सुर व्यसन कोकीळे ते तुझे नाही ! तुझ्या सुरातली तंद्री तुझ्या स्वरातली धुंदी ते धुंदावणे तुझे नाही ! तानपुर्‍याची मधुर तान किंचित लवणारी सुरेल मान ते वेडावणे तुझे नाही ! तुझे सुर श्वासात भिनलेले त्या स्वरांसह श्वासांची गती वाढणे तुझे नाही! तो हक्क आम्हा रसिकांचा तुझ्या गळ्याच्या गुलामाचा ते भाग्य कोकिळे तुझे नाही स्वरकोकिळा मा. लतादीदींच्या एका वाढदिवशी ही कविता केली होती. विशाल

" छाया "

शितल ·
लेखनविषय:
जेमतेम ५ फूट उंची असलेली, सावळी, गोल चेह-याची, काळेभोर बोलके डोळे असलेली, खांद्या पर्यंतचे केस कधी मोकळे सोडलेले, कधी एक पॉनीटेल बांधलेली, तिच्या गोड हास्याने अजून गोड वाटणारी, बडबडी "छाया", तिची ही दुर्दैवी कहाणी. एका निष्पाप, गोड मुलीचा एक दुर्दैवी अंत आठवून आजही मन अस्वस्थ होते. त्यावेळी मी शाळेत असेन, आणि ती कॉलेज मध्ये. आमच्या मध्ये ५/६ वर्षाचे अंतर असेल. त्यावेळी आम्ही एका वाड्यात राहत होतो. आमच्या शेजारी दोन मुली राहत होत्या, दोघी बहिणी - बहिणी. एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात होत्या, त्यांची छाया ही मैत्रीण.