मालवणी गजाल.
आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान.
झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय.
मिसळपाव