Skip to main content

कथा

नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे? (लघुतम कथा)

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 02/10/2007 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी संध्याकाळी मेरीचा फोन आला. म्हणे "उद्याची काय गंमत आहे, माहितीए? ते चित्रकार विल्यम ब्राउन आहेत नं? ते आपला स्टूडियो आपल्या चाहत्यांसाठी उघडा ठेवणार आहेत. अरे आपल्याला थोडीच परवडताएत त्यांची चित्रं, पण कलाकारासमक्ष त्यांची कला अनुभवायची काय नामी संधी!" मी म्हटले, "वा, सुंदर!" "पण तुझा मित्र राजेश, बथ्थडासारखा टेनिस खेळायला जातोय म्हणतो." "बयो, राजेश आधी तुझा नवरा, मग माझा मित्र आहे. त्याच्या रुक्षपणाचा जाब मला नको विचारूस." "ए राजेश! आयडिया!" मला फोनवर लोंबकाळत ठेवत ती ओरडली. "तू जा टेनिस खेळायला. मी जाईन स्टूडियोत तुझ्या या मित्राबरोबर.

चला कथा लिहू या

लेखक आजानुकर्ण यांनी मंगळवार, 18/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. आपल्याकडे अतिशय प्रतिभावान साहित्यिक आहेत. चला आता सर्वजण मिळून एक कथा लिहूया. १. प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एक परिच्छेद लिहिण्याची परवानगी आहे. २. परिच्छेद शक्यतो दहा ओळींपेक्षा जास्त नसावा ३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. अशी साधारण मार्गदर्शक तत्त्वे. चला तर मग.