मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

पुष्कर ·
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.

धग

रातराणी ·
" संपूर्ण मानवजातीसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे ठाकले असताना आपल्या देशातील सरकार आपल्याच देशबांधवांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकते? फक्त ते गरीब आहेत म्हणून? त्यांच्या राहण्याचा तसाही काही ठावठिकाणा नव्हताच मग आता तरी त्यांची चिंता कशाला करा? की मग जातायत तर जाईनात का...उद्या त्यांच्या ओस पडलेल्या वस्त्यांवर टोलेजंग इमारती बांधून आपले तळवे चाटणाऱ्या अधिकारी, मंत्र्यांच्या पुढच्या पिढीची सोय करायची आहे? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं. मग आजचे राजकारणी नक्कीच मनुष्य नाहीत. एक सत्ता सोडली तर इतर काहीही त्यांना प्रिय नाही.

आणि अश्या वेळी

कौस्तुभ भोसले ·
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

पाताळ लोक!

लई भारी ·
बऱ्याच दिवसांनी सलग एक सिरीज बघता आली. लॉकडाऊन सुरु झाल्यावर कामातून वेळ मिळाल्यावर काही मराठी, हिंदी सिरीज बघून इंग्रजीच बघायच्या असं ठरवलं होत. मग अलीकडे या प्राईम वरच्या सिरीज ची जाहिरात बघितली आणि सुरुवातीची परीक्षणं पण चांगली असल्यामुळे बघायचं ठरवलं. २-३ दिवसात मिळून ९ भाग संपवले(प्रत्येकी ४० मिनिट साधारण). विशेष म्हणजे बॉलिवूड मानसिकता असल्याने अधांतरी शेवट आपल्याला आवडत नाही आणि वेब सिरीज म्हटलं कि पुढच्या भागाची सोय म्हणून एकदम अर्ध्यातच सोडून देतात तो प्रकार इथे नाही आहे. आणि प्रश्नांची‘उत्तर’ तर लागतात आपल्याला; थोडं फार ओपन एंडेड ठीक आहे पण अगदीच डोक्याला शॉट नको होतो.

रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

चौथा कोनाडा ·
रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा धागा निघालेला आहे, आणि मिपाकरांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत ! मतकरींच्या कथा वाचताना अचानकपणे अक्षर दिवाळी अंकात त्यांच्या अ‍ॅडम या कादंबरीची भेट झाली ! त्यातील शृंगारिक वर्णने वाचून चळायला झालं. सुरुवातीच्या काही पानांनंतर कादंबरीचे मनाचा ताबाच घेतला. दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवरील पात्रांनी मनात घर केले.

अल्टर्ड कार्बन- वेबसिरीज ओळख

कपिलमुनी ·
आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे. पण ...... पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल . अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे.

मसाया - Messiah

कपिलमुनी ·
जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक ! हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो. आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ?

आवडते हिंदी/मराठी चित्रपट

Prajakta२१ ·
असे काही चित्रपट असतात जे आपण कितीही वेळा न कंटाळता बघू शकतो चॅनेल surfing करताना हे picture असतील तर रिमोट खाली ठेवून तो चित्रपट बघितलाच जातो,PC वर डाउनलोड करून ठेवतो असे ऑल टाइम फेवरीट सारखे माझे १.

श्रद्धांजली - ऋषि कपूर

किसन शिंदे ·
काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती. व्यक्तीशः माझ्यासाठी ऋषि कपूर हा त्याच्या पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अभिनेता म्हणून जितका समोर येत गेला तितकाच तो आवडत गेला.

ऋतुराज वसंताचे आगमन

अविनाशकुलकर्णी ·
ऋतुराज वसंताचे आगमन चैत्राचं वर्णन करणारी आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणा-या वसंत ऋतूचं गुणगान अनेक पदं आपल्या मराठीत आहेत. गाण्यांमधून आलेलं वसंत ऋतूचं वर्णनही तितकंच बहारदार आहे.