'तंबोरा' एक जीवलग - ९

लेखनविषय:
लेखनप्रकार
सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात. याला दैवी नाही तर काय म्हणावे! हे लिहिताना अशा मी काही ऐकलेल्या गवय्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणि सूर कानात गुंजतो आहे. त्या आगोदर मी न ऐकलेल्या पण ज्यांच्या सुराबद्दल ऐकलेल्या गवय्यांबद्दल.

'तंबोरा' एक जीवलग - ८

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज बर्‍याच दिवसांनी आले इथं. दिवाळी अंकातील माझा लेख तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचला, आवडला, हे पाहून बरे वाटले. नंतर काही कारणाने माझी भ्रमंती सुरू होती. ती आतापर्यंत. मग लिहायला जमले नाही. तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. हवाही प्रतिकूल पडली होती त्या मुळे प्रकृतीचे आढेवेढे नेहमीचेच त्यातून आताच जरा सावरलेय पुढे लिहिण्याची थोडी उमेद वाटते आहे असो. तालिम सुरू झाली इथपर्यंत लिहिले होते. काही हकिकतीही सांगितल्या होत्या. गाणार्‍याच्या आयुष्यात असे किस्से हकिकती असायच्याच.

उभे गाढव मुकाबला

लेखनविषय:
शीर्षक वाचून आपणास हा लेख जलिकट्टी व तत्सम चुरसदार खेळाची माहितीपट आहे अशी अपेक्षा असेल तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. सहसा अशी वाक्ये तळटीप म्हणून वापरतात परंतु लेखाच्या सुरवातीलाच असे वाक्य टाकण्याचे 1च कारण !वाचकसंख्या वाढवण्यासाठी थोडा "धुरळा " उडवायचा होता. धुरळा हा समीर विद्वंस दिग्दर्शित चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित झाला .२०-२०च्या जमान्यात नव-वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने झाली. चित्रपट पाहिला नि आवडला सुद्धा. धुरळा चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे.

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

उरलो आता भिंतीवरल्या ...  

तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही.

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या

कलाक्षेत्र च्या आठवणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या भागाला सिकन मटन फिस पार्ट २ असे म्हणायला हि हरकत नाही. माझ्या कलाक्षेत्र च्या आठवणी लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत. कलाप्रेमींचे ते तीर्थक्षेत्र ...पवित्र आणि निसर्गरम्य जागा. अगदी समुद्राच्या जवळ असल्याने रात्री लाटांचा आवाज आणि खाऱ्या पाण्याचा (मासोळी बाजारात येणारा) वास घेत रात्रीची झोप लागायची. सगळीकडे समुद्र काठची बारीक रेती, उन्हा मध्ये गरम रेती वर चालले कि पायाला नॅचरल मसाज व्ह्यायचा. संध्याकाळी ७. ३० ला रात्रीचे जेवण झाले कि आम्ही थोड्या वेळ समुद्राचे गार वारे खात आकाशाकडे बघत बसायचो. मनाला इतका शांत त्यानंतर कधीच वाटलं नाही.

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू  भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार

'तंबोरा' एक जीवलग - ७

लेखनविषय:
लेखनप्रकार
गंडाबंधन झाल्यावर शिक्षणाला सुरुवात झाली हे मागच्या भागात लिहिलंच आहे. खां साहेबांनी पहिला राग शिकवायला घेतला तो भैरव. संपूर्ण; म्हणजे सगळ्या सुरांचा राग. सप्तकातले सगळे सुर येतात यात. भैरव म्हणजे शंकर. खाली येताना हलणार्‍या धैवताचा गोडवा अत्यंत गोड लागतो. रागाची प्रकृती धीरगंभीर. पहाटेच्या वेळची मऊ मृदु कोवळीक आणि शिवाच्या डमरूचा, शंखाचा धीर गंभीर नाद याच मिश्रण आहे या रागात. रागाचा आवाका मोठाच आहे तसा पण लगेच ओळखता येतो. खां साहेबांच्याकडे शिकण्यापूर्वी आईकडे तसे जुजबी शिक्षण झालं होतं माझं. खां साहेबांनी शिकवायला काढला तेंव्हा 'भैरव' म्हणून ओळखला होता मी, पण बोलले मात्र नाही.
Subscribe to कला