परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...
"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?”
आहे.
“महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“
असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.
“महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “
हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.
मिसळपाव
त्यांना श्वसननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलेले असून सध्या ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा हीच ईश्वरचरणी सार्या मिपा परिवारातर्फे प्रार्थना...!
तात्या.
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.
बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.
अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.