Skip to main content

कला

स्वातंत्र्यदिनानिमित्त वंदे मातरम्! आणखी दोन बाल कलाकार

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 16/08/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं! सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत. पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले.

परिक्षण-गंध (छोटा डॉन स्टाईल)

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 15/08/2009 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच. * पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला? - 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच.

आणि कॉमन मॅन बोलला!

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

हिंदोळा

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 05/08/2009 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदोळा साम्राज्ये लयाला जाती पडली नि:शस्त्र समता भाव तेथे ऋजुता टणत्कार ढसाढसा तप्त अग्निवर्षा सुप्त जनगणना भावविभोर कंकणराणा तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार गोक्षुरादि गुग्गुळ संहत नायट्रिक आम्लात माझ्या दुधारी वेदनेचे समूळ उच्चाटन प्रेरणा समिधा यांची एकत्र भावधुम्मस आणि एकटाच डोलणारा सचिंत हिंदोळा ५ ऑगस्ट २००९, पुणे
काव्यरस

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 05/08/2009 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.

मेघना माझी बहीण..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 04/08/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं. मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच. मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच! मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली.

पावसाळी छायाचित्रण....

लेखक नानबा यांनी बुधवार, 29/07/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद...

वाघोबा :)

लेखक झकासराव यांनी बुधवार, 29/07/2009 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ. एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी. जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत. काय म्हणता खालील फोटु बघुन. :) एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ. आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच. पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत.