Skip to main content

कला

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

विणकाम

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 14/10/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच. तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच... माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत. मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य.

पंचाक्षरी आकांत

लेखक शरदिनी यांनी रविवार, 04/10/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
करालदाढा पुलकित पेढा चतुरचर्‍हाटी चंचलमूढा गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी सर्जनदर्जन भजनगुंजनी का सृष्टीच्या भग्नमंथनी तगमग लगबग मूढचिंतनी तिरकस हलकट कृद्धधरित्री गडणी सजणी गडणीसजणी नयनवल्लरी सहजचिल्लरी पुनःपुन्हा ती उडनतश्तरी लखलख चकमक मंददर्शनी कांता करी आकांत आननी शरणमंजिरी विदुरप्रस्तरी धृष्टद्युम्नी चरितविलासी ललाटज्वलिता दारूणपलिता शिशिरवंचना टाहो फुटता पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन
काव्यरस

तीन काळी गाणी

लेखक प्रदीप यांनी गुरुवार, 24/09/2009 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे. गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे. पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है?

माझे रिकामपणाचे उद्योग....२ बुकमार्क्स...!!!!

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 23/09/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझे रिकामपणाचे उद्योग--- भाग १!!! तसं पाहता गेलं तर माझं नी एखाद्या कलेचं एकदम वाकडं... म्हणजे एखादं काम करायला लागणारी नजाकत कशाशी खातात हेच माहीत नाही.. त्यामुळं आईच्या भाषेत माझ्याकडे एखादं नाजूक काम... म्हणजे फक्त 'धडा'चा विध्वंस!!!! नी याबाबतीत घरी तसंही कुणाचं दुमत नाही... लहानपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शनचं राज्य होतं.... तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे.. नि लोक कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून आपली कामं करायचे... पुन:प्रक्षेपण पण तितकंसं व्हायचं नाही.. नि झालं तरी त्याच्या आगाऊ सूचना तर नसतच नसत....

लेह - लडाख -काश्मिर

लेखक विलास आंबेकर यांनी रविवार, 20/09/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.

काही रेखाटने

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 10/09/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
काही नवीन रेखाटने... मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्‍यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो. टीप : चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...

निर्गेन्द्वो इन आफ्रिका

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 04/09/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुन्हा एक न कळणार्‍या भाषेतला (खरंतर भाषांतला) चित्रपट बघितला आणि पुन्हा एकदा भाषेपलिकडच्या निव्वळ भावनांचा आस्वाद घेता आला. याआधीही अनेकदा झालं आहे आणि याहिवेळी पूर्ण भारावलो आणि घरच्यांना हीच एक कथा दहादा सांगूनहि समाधान झालं नाहि. कोणाला तरी सांगावं असंच वाटत राहिलं म्हणून तडक मिपावर लिहायला बसलो. तर मी काल बघितला २००२ चा ऑस्कर विजेता चित्रपट "निर्गेन्द्वो इन आफ्रिका". वंश, वर्ण, देश, संस्कृती यांच्या सीमा भेदणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकाच्या मनातील कुंपणांनाहि हलवून सोडणारा हा एक चित्रपट.

माझं कुमामोतो

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 02/09/2009 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी जिथे रहाते ते कुमामोतो शहर, माझं याबे गाव आहे तरी कसं? ते पहायचं असं कित्तीतरी दिवस वाटत होतं. पण "आज जाऊ, उद्या जाऊ" असं करता करता चक्क दोन वर्ष उलटून गेली. आणि मग ह्यावर्षी आईबाबांबरोबर त्यांची दुभाषी म्हणून जायचा योग आला. आणि मी कुमामोतोच्या प्रेमात पडले. का? त्याचं हे (प्रकाश)चित्रमय उत्तर... माऊंट आसो...ऊर्फ आसोसान हा अगदी माझ्या "बगल मे" म्हणावा तसा. घरापासून गाडीने फक्त चाळीस मिनिटांवर. जपानमधला सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी. खरं म्हणजे हे चार पर्वत. पण ह्यातला एकच जिवंत आहे. (नशीब!) ह्याचं सहाशे मीटर रुंदीचं मुख पाहिलं की आपलं मुख उघडं पडतं.

श्याम जोशींनी आर. के. लक्षमण यांना दिलेली दाद

लेखक नितीनमहाजन यांनी बुधवार, 02/09/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही दिवसांपूर्वी अदितीताईंनी Common Man व R. K. Laxman यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी एका व्यंगचित्राची आठवण सांगितली होती. R. K. Laxman यांना Raman Magasese पुरस्कार मिळाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म. टा. मध्ये प्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी R. K. Laxman यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. ते मी नुकतेच scan करून सर्वांसाठी येथे डकवित आहे. जर copy right चा प्रश्न उपस्थित होत असेल तर संपादकांनी हे चित्र खुशाल काढून टाकावे. Common Man & R. K.