वेगळा होता.....
चांदण्याही त्याच होत्या पौर्णिमेच्या रातीला
तुझ्या डोळ्यांतील आकाशाचा , रंग वेगळा होता !
एक होता सूर अपुला एक होती रागदारी
तुझ्या गळ्यातून ठहरणारा , ढंग वेगळा होता !
न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका
ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता !
फुलला कधीचा परसदारी धम्म पिवळा सोनचाफा
मोकळ्या केसांत सजला , तो संग वेगळाहोता !
हाय् ! ओलेत्या तुझ्या कांतीस बिलगली ती उन्हे
लाज गाली पाहणारा सूर्य , दंग वेगळा होता !
सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा
प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !