सांगता.....
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सांगता.....
लागला माझा लळा या आसवांना फार आहे
जाहला नाही बरा जो , हा असा आजार आहे !
हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा
गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे !
बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे
ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे !
मैफिलीने गीत माझे अन् मला वाखाणले
लांब सदर्याआड आता .....फाटकी विजार आहे !
शेवटी रडलीस तू अन् स्वच्छ मी झालो पुन्हा
जा सुखाने नांद सखये , बोलली.....मझार आहे !
वाचने
1434
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे
ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे !
=D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा
गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे !
क्या बात है!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आप्ल्या प्रतिसादाबध्दल मंडळ आपलं लय आभारी हाये !
कमालीचा शेर!