का?
सजल्या तुझ्या वेणीवरी
मोगरा फुलला न का?
ऐन आषाढातला
पाऊस का झाला सुका?
अजून तू माझ्या कवेत
'एकटा' मी, "दूर" का?
सर्वस्व लुटुनी मी कफल्लक
हाय् ! तू मजबूर का?
राहिल्या गझला अभंग
का बुडाला पण तुका?
मैफिलीच्या स्वागताला
भैरवीचा सूर का?
२५ एप्रिल '०९ , स.०६.३०
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1951
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद दिपक साहेब !
चांगलंय, पण..
भैरवी
कविता छान
पाऊस सुका होणे
आभार
मस्त!