Skip to main content

अष्टौप्रहर.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 05/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अष्टौप्रहर..... येते अशीच केंव्हा केंव्हा पहाट ताजी ओठांत अमृताची देतेस ठेव माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी सकाळ करतेस दाट आणिक जवळीक फार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी दुपार डोळ्यांत धुंद दिसते , मिठी अनिवार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा चुकार संध्या गाण्यात छेडतो मी , मनची सतार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरीच रात्र येतो सुगंध, फुलते , "जाई" क्षणांत माझी ! ------------------२७ जुलै १९८४.....................
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1188
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया